कर्तव्यदक्ष सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना सुवर्ण पदक जाहीर

- Advertisement -
- Advertisement -

 

अकोले, ता.१५ प्रतिनिधी
कळसूबाई हरिश्चंद्र गड अभ्यारण्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना महाराष्ट्र वनविभाग यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल सुवर्ण पदक जाहीर केले आहे यापूर्वी धुळे येथे काम करताना त्यांनी आपल्या सुवर्ण पदकाचे निक ष पूर्ण केले .अतिशय कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे .स्वर्ण पदक देताना समितीने  खालील काही मुद्द्यांचा विचार करण्यात आला..
वनसंरक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी सुमारे 100 हून अधिक अवैध वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो, पिकप व उत्खनन करणारे ट्रॅक्टर व इतर वाहने जप्त करण्यात आली व अनेक वाहने सरकार जमा करण्यात आले.
*अवैध तस्करी करणाऱ्या ठिकाणी सुमारे चाळीसहून अधिक ठिकाणी धाड टाकून खैर, चंदन, साग, शिसम इत्यादी मौल्यवान प्रजाती जप्त करून शासनास सुमारे करोडो रुपयांचा महसूल जमा करून दिला.
*वना लगत असलेल्या सर्व गावांमध्ये एलपीजी गॅस वाटप व इतर शासनाच्या प्रभावी योजना अंमलबजावणी केली.
*सुमारे सहा ते सात वन्यजीव गुन्हे प्रकरणे(मांडूळ तस्करी, वन्यजीवांची कातडी तस्करी, पक्ष्यांची तस्करी घोरपड तस्करी) आरोपीसह उघडकीस आणले.
*मोठ्या प्रमाणावर अवैध अतिक्रमण निर्मूलन करण्यात आले.माजी आमदार वैभव पिचड , राजूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शांताराम काळे ,वनपरिक्षेत्र अधिकारी डी . डी . पडवळ , अमोल आडे यांनी वनसंरक्षक रणदिवे यांचे अभिनंदन केले आहे..

Related Articles

4 COMMENTS

  1. My partner and I absolutely love your blog and find many of your post’s to be
    what precisely I’m looking for. Would you offer guest writers to write content for you personally?

    I wouldn’t mind writing a post or elaborating on a few of the subjects you write related to here.
    Again, awesome site!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles