श्री रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी
शिर्डी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,shirdi शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी Ram Navami उत्सवातील आजच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची व्दारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच कावड पूजा जिल्हाधिकारी सिध्दाराम सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आली. गेल्या दोन दिवसापासून साईबाबांच्या रामनवमी उत्साहास प्रारंभ झाला होता.
श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातुन पालख्यां सोबत आलेल्या पदयात्री साईभक्तांच्या श्री साईनामाच्या गजराने अवघी शिर्डी दुमदुमुन गेली.
उत्सवाच्या मुख्य दिवशी आज गुरुवार, दिनांक ३० मार्च रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती झाली. पहाटे सुरु झालेल्या अखंड पारायणाची समाप्ती होवून श्रींच्या फोटो व पोथीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी वीणा, वैद्यकीय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक व संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी यांनी shirdi sai baba श्रींची प्रतिमा घेवुन मिरवणूकीत सहभाग घेतला. याप्रसंगी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, सौ.मालती यार्लगड्डा, सौ.मिनाक्षी सालीमठ, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
या निमित्ताने आज दिवसभर विविध कार्यक्रमाचे shirdi live आयोजन करण्यात आले आहे.
तसेच हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने sai baba समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. यामुळे दिनांक ३० मार्च रोजीची नित्याची शेजारती व दिनांक ३१ मार्च रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
sai baba utsav shirdi उत्सवा निमित्त व्दारकामाई मंडळ, मुंबई यांच्या वतीने समाधी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तर मंदिर प्रवेशव्दारावर श्रीराम, लेंडीबागेत साई पालखी मिरवणुक व श्री साईप्रसादालयाच्या प्रवेशव्दारावर शिव भोला भंडारी…साई भोला भंडारी हे भव्य देखावे उभारले आहे. याबरोबरच समाधी मंदिर व परिसरात अमेरिका येथील दानशूर साईभक्त श्रीमती शोभा पै यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
सकाळी ०६.२० वा. कावडींची मिरवणूक व श्रींचे मंगलस्नान व दर्शन. सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी १० ते १२ यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर ह.भ.प.श्री.विक्रम नांदेडकर यांचे श्रीरामजन्म किर्तन कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. माध्यान्ह आरती होणार आहे. दुपारी ०४.०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं. ०५.०० वा. श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्यानंतर सायं. ०६.३० वा. धुपारती होईल. रात्रौ ०७.१५ ते ०९.१५ यावेळेत मंगेश अमदुरकर, वर्धा यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार असून रात्रौ ०९.१५ वा. श्रींची गुरुवारची नित्याची पालखी मिरवणूक होईल. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल.