Police rank list राजूर पोलीस ठाणे बनले राज्यातील उत्कृष्ट पोलीस स्टेशन

- Advertisement -
- Advertisement -

 

अहमदनगर

Police rank list अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस ठाण्यांना राज्य पातळीवर निवड करून या पोलीस ठाण्यांचा सन्मानचिन्ह आणि रोख बक्षीस देऊन सन्मान केला जातो.

राज्यात निवडलेल्या पाच पोलीस ठाण्यांमध्ये जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर पोलिस ठाण्याचा समावेश झाला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

 

दर वर्षी राज्यामध्ये उत्कृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेकरिता राज्यातील chief of police सर्व परिक्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या पोलीस ठाण्यांची निवड करून त्यांना राज्य पातळीवर सन्मानित करण्याचे काम पोलीस दलाच्या वतीने केले जाते.

 

या अनुषंगाने या पोलीस ठाणे यांचा समावेश करताना त्याची कार्यक्षमता, कामगिरी वाढवणे ,तसेच दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पद्धतीने काम करणे आणि गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहित करणे हा हेतू साध्य करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पाच पोलीस ठाणे यांची निवड करून police departments त्यांना सन्मानित केले जाते.

Police rank list

 

राजूर पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन  हा मान मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे, राहुल मदने, विभागीय पोलीस अधिकारी नितीन पाटील, राजुर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी नरेंद्र साबळे यांनी आणि राजुर पोलीस ठाणे येथील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

बीड जिल्ह्यात 1 ते 7 च्या शाळा सोमवारपासून सुरु

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles