अकोले , ता . ११:
जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड याना एकटे पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व जिल्ह्यातील प्रस्थापितांनी शह देण्याची भूमिका बजावल्याचे चित्र या निवडणुकीनिमित्ताने पुढे आले आहे .
त्याचाच भाग म्हणून जिल्हा सहकारी बँके च्या तालुका सहकारी संस्था मतदारसंघात सीताराम गायकर यांचा उमेदवारी अर्ज होता मात्र राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजकीय गणिते आखात त्याच्याविरोधात दशरथ सावंत , सुरेश गडाख यांची उमेदवारी मागे घेण्यास सांगून गायकर यांच्या निवडीचा मार्ग सुकर करत त्यांना आपल्या जाळ्यात ओढले .तर भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या नाट्यमय माघारीनंतर माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही अमित भांगरे यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून त्याच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर केला असल्याची चर्चा आहे .
जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष अशोक भांगरे हे जिल्ह्यामध्ये दीर्घकाळ विखे समर्थक म्हणून ओळखले जात होते . हे याठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे . याचाच अर्थ पिचड पिता पुत्र यांची राजकीय कोंडी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रस्थापित एकत्र आल्याचे दिसून येते .माजी आमदार वैभव पिचड याना जाणीवपूर्वक जिल्हा सहकारी बँके सत्तेतून दूर सारले या खेळीची चर्चा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सुरु आहे . तालुक्यातील सहकारी संस्थेच्या ८४ मतदाराने मध्ये सीताराम गायकर निवडून आले असतेच असा कार्यकर्त्यांचा होरा होता मात्र अचानक राजकीय गणिते बदलत नाशिक मार्गे संगमनेर , लोणी ते नगर अशी सहमती एक्स्प्रेस धावून गायकर भांगरे याना बिनविरोध करण्याचा यशस्वीही प्रयोग होऊन माजी आमदार वैभव पिचड याना एकटे पाडून पिचड यांची राजकीय कोंडी करण्यात आल्याची भावना वैभव पिचड यांच्या माघारीनंतर गावागावात , वाडी वस्तीवर , पानटपरीवर चर्चेला उधाण आले होते . मात्र भांगरे गायकर विखे कि थोरात याबाबत अजून खूप पाणी वाहून गेल्यावरच कळेल हे तितकेच खरे असे एका जेष्ठ काँग्रेस नेत्याने नाव न छापण्याच्या बोलीवर सांगितले . आदिवासी समाजा मध्ये मोठी अस्वस्थता असून काशिनाथ साबळे , भरत घाणे , सी बी भांगरे , सुरेश भांगरे सरपंच परिषदेचे सचिव पांडुरंग भांगरे , सयाजी आसवले , गंगाराम धिंद ळे , सुनील सारुक्ते , विजय भांगरे , संपत झडे , पांडुरंग खाडे , जयराम उडे,आदींनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे ,
हेही वाचा : अभिनेता, निर्माता राजीव कपूर अनंतात विलीन
अकोले तालुक्याचे राजकीय चित्र व समीकरणे हि आता बदलू लागली असून अमित भांगरे यांच्या रूपाने आमदारकीच्या स्पर्धेत नवीन चेहरा आला असल्याची चर्चा आहे .
[…] Read more:जिल्हा सहकारी बँकेत राष्ट्रवादी , … […]