- Advertisement -
- Advertisement -
अकोले,ता.३० प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच गोवारी आदिवासी समाजाबद्दल दिलेल्या निकालाचे स्वागत करून, याकामी पाठपुरावा करणारे माजी मंत्री तथा भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांना गुजरात राज्यातील कच्छ येथील सेवानिवृत्त अधिकारी अ.स.वसावे यांनी पत्र पाठवून भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर धनगर जात ही अनुसूचित जमातीत येऊच शकत नाही याबाबत गेल्या पाच-दहा वर्षांपासून होत असलेल्या मागणीकडे लक्ष वेधत खंत व्यक्त केली आहे.
याबाबत सेवानिवृत्त अधिकारी वसावे यांनी माजी मंत्री पिचड यांना पाठवलेल्या पत्रात पुढे म्हंटले आहे की, गोवारी निकालाबाबत तुमची प्रतिक्रिया वाचून मला आनंद झाला, म्हणून हे पत्र पाठविण्याचा खटाटोप केला आहे. याकामी तुम्ही घेतलेली भूमिका बरोबरच होती. म्हणून नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर बरीच टीका-टिपण्णी झाली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल करत तुमच्या बाजूने निकाल दिला. यावरून शेवटी सत्याचाच विजय होत असल्याचे सांगून न्यायालयच आपल्यासाठी देव ठरले आहे. यापूर्वीचे दोन आणि आत्ताचा हा निकाल पाहून राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी धनगर आरक्षण प्रश्नावर शांत बसावे अशी अपेक्षा व्यक्त करून खऱ्या आदिवासींनी सतर्क रहावे असे आवाहन केले आहे. आणि यासाठी आदिवासी विकास मंत्री पाडवी यांना पक्षीय मतभेट विसरून जोरदार पाठिंबा द्यावा अशी मागणीही शेवटी केली आहे.
अंबेजोगाईकरांनी जागविल्या इलाही जमादार यांच्या स्मृती