Pandharpur news पंढरपूरात 2275 फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची यात्रा

- Advertisement -
- Advertisement -

पंढरपूर
Pandharpur news अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंढरपूर या ठिकाणी 2275 फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.

विशेष म्हणजे पंढरपूर याठिकाणी देशातील सर्वात मोठी तिरंगायात्रा निघाली. यावेळी विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थी परिषदेने 2275 फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची पंढरपूर याठिकाणी मिरवणूक काढली. या तिरंगा यात्रेस साधारण 5 हजाराहून अधिकचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

याप्रसंगी आमदार प्रविण दरेकर ,आ. समधान आवताडे, प्रशांत परिचारक , अभिजीत पाटील आणि प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी तिरंगा ध्वजाचे पूजन करुन तिरंगायात्रेची सुरूवात केली. यावेळी भारत माता की जय , वंदे मातरम अशा घोषणानी संपुर्ण पंढरपूर शहर भारावून गेले.

याप्रसंगी सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. भव्य-दिव्य अशी अदभूत तिरंगा यात्रा पंढरपूर याठिकाणी निघाल्याने प्रत्येक नागरिक व येणाऱ्या विठ्ठल भक्तांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण झाली.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles