पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा पराभव

- Advertisement -
- Advertisement -

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा पराभव
सोलापूर दि 2 मे
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपाच्या समाधान आवताडे यांनी तब्बल 3 हजार 733 मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा निसटता पराभव झाला आहे.

राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीने मतदान झाले होते. त्याची मतमोजणी रविवारी 2 मे रोजी पंढरपूर येथे पार पडली.
या निवडणूकीसाठी एकुण 3 लाख 40 हजार 889 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी मतमोजणीच्या 38 व्या फेरी अखेर विजयी उमेदवार आवताडे यांनी 1 लाख 9 हजार 450 मतं घेतली तर राष्ट्रवदीचे उमेदवार भालके यांना 1 लाख 5 हजार 717 मतांवरच समाधान मानावेल लागले.या निवडणूकीत आवताडे यांनी 3 हजार 733 मतांनी विजय मिळविला आहे.

 

बीड जिल्हा परिषदेचे दातृत्व,रुग्णालयास लोकसहभागातून 100 ऑक्सिजन जम्बो सिलेंडर

मतमोजणीच्या सुरुवातील पोस्टल मतं मोजण्यात आली त्यामध्ये एकुण 3331 पैकी भाजपाचे समाधान आवडे यांना 1676 तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना 1446 तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना केवळ 24 मतं मिळाली.

सुरुवातीच्या चार फेर्‍या पर्यंत भगीरथ भालके यांनी काही अंशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सहाव्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली ती आघाडी मतमोजणीच्या शेवटच्या 38 व्या फेरी पर्यंत कायमच राहिली.त्यामुळे आवताडे यांचे वाढत चालेले मताधिक्य रोखण्यात भालके यांना अपयश आले.

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीत एकूण 19 उमेदवार रिंगणात होते, पण इतर उमेदवारांना हजार मतंही घेता आली नाहीत. पंढरपूर मतदारसंघातून घेतलेली आघाडी आवताडे यांनी मंगळवेढ्यात कायम ठेवली.त्यामुळे प्रत्येक फेरीच्या निकालांती त्यांचे मताधिक्य वाढत गेले. या निवडणूकीसाठी भाजपाच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ प्रशांत परिचारक, खा रणजिसिंह नाईक निंबाळकर, आ.गोपीचंद पडळकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ संजय शिंदे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.मात्र पंढरपूर मंगळवेढ्याचा मतदारांनी महाविकास आघाडीला नाकारत भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles