३१ डिसेंबर ला गड किल्ले वर रात्री थांबता येणार नाही

- Advertisement -
- Advertisement -
अकोले /शांताराम काळे 
हरीशचंद्रगड , रतनगड , पट्टा किल्ला ,कळसुबाई , भैरोबा या गड , किल्ले , मंदिरे या ठिकाणी ३१ डिसेंबर ची रात्र जागवण्यास बंदी घालण्यात आली आहे याबाबत स्थानिक वन कमिटी व वनविभाग , पोलीस प्रशासन यांनी एकत्र येत याबाबत निर्णय घेतला असून त्यामुळे रात्र जागविण्याचा मनसुबा तरुणाईला यावर्षी पूर्ण करता येणार नाही .
        वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या अभयारण्यात असलेल्या गड किल्ले , धबधबे , मंदिरे या ठिकाणी  दरवर्षी  तरुणाई ३१ डिसेंबरच्या रात्री येऊन नवीन वर्ष साजरे करत असते . त्यामुळे गडावर , मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य , प्लास्टिक बाटल्या , प्लास्टिक कचरा होऊन येथील शांतता भंग केली जाते  . त्यामुळे ३१ डिसेंबर ला सकाळी गेलेले पर्यटक सायंकाळी सहा वाजता गाद किल्ल्यावरून खाली येतील तसेच जाताना कोणतेही मद्य , प्लास्टिक बाटल्या नेता येणार नाही जाणारे पर्यटक नोंद करून जातील पर्यटकांना मास्क लावण्यासह सुरक्षित अंतराचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असेल.
       सोबत स्वतःचे सॅनिटायजर बाटली आणावी लागेल. ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी असलेल्या पर्यटकांना पर्यटनासाठी प्रतिबंध करण्यात येईल. यासह खोकला, ताप असल्यास पर्यटनास येऊ नये. कोविड-१९ अंतर्गत शासकीय नियमांचे पालन न झाल्यास संबंधित पर्यटकांविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश वनक्षेत्रपालांना देण्यात आले आहेत.
        पायथ्याशी असलेल्या वनव्यवस्थापन समिती सदस्य अथवा वनरक्षक त्याची नोंद घेऊन दिवस गेलेले सहा वाजेनंतर कुणीही गड किल्ले अथवा मंदिरात थाम्बणार नाही. अन्यथा पाच हजार दंड व कारवाई केली जाणार आहे . कोट — गणेश रणदिवे (सहायक वनसंरक्षक वन्य जीव )३१ डिसेंबर रोजी निसर्ग सहलीचे निम्मित करून गडावर , मंदिरात अथवा  कोकणकड्यावर कुणालाही रात्र जागवत येणार नाही तसे आदेश देण्यात आले असून स्थानीक वन समिती व वनविभाग अधिकारी कर्मचारी पोलीस यांचेमार्फत देखरेख ठेवून काळजी घेतली जाईल व नियम बाह्य वागणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई होईल याची सर्वानी दक्षता घ्यावी.

Related Articles

3 COMMENTS

  1. Today, with all the fast life style that everyone is having, credit cards have a big demand throughout the economy. Persons coming from every discipline are using credit card and people who aren’t using the credit cards have made arrangements to apply for one in particular. Thanks for expressing your ideas about credit cards. https://psoriasismedi.com psoriasis medication

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles