बहुप्रतीक्षित नगर-आष्टी रेल्वेचे 7 मे ला उद्घाटन

- Advertisement -
- Advertisement -

new railway line in Maharashtra बहुप्रतीक्षित नगर-आष्टी रेल्वेचे 7 मे ला उद्घाटन

अहमदनगर

 

new railway line in Maharashtra नगर-आष्टी दरम्यान नव्याने सुरुवात होणारी रेल्वे 7 मे  रोजी  होणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले.

मुंबई येथे आयोजित भायखळा रेल्वे स्थानकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा, भाजपच्या शायना एन सी रेल्वे चे जनरल मनेजर अनिल कुमार लाहोटी उपस्थित होते.

नगर बीड परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचे पूर्ण काम झाले आहे.आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह हे तीन स्टेशन पूर्ण झाले आहेत. गेल्या महिन्यात या ट्रक वर रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण तपासणी करण्यात आली. या ट्रक वर १२० प्रती तास वेगाने मोठी रेल्वे धावली त्यामुळे या ट्रक वरील रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ह्या रेल्वेचे उद्घाटन  केंद्रीय  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे आणि नगरचे खासदार डॉ सुजय विखे यांच्या प्रमुख  उपस्थितीत रेल्वेचे अधिकारी उपस्थितीत असणार आहेत.

 

या रेल्वे मार्गासाठी दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर, स्वर्गीय माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केले होते . नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध  झाला आणि या कामाने गती घेतली.अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर लोहमार्गाचे काम ही पूर्ण झालेले आहे .

नगर ते नारायणडोह पर्यंत 17 मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती . नंतर नगर – नारायणडोह – सोलापूरवाडी या 15 किमी अंतरावर दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्याची रेल्वे चाचणी झाली. त्यानंतर गेल्या 29 डिसेंबर रोजी नगर ते आष्टी दरम्यात चाचणी झाली.

दिनांक 9 डिसेंबर रोजी नगर कडा दरम्यान दोन डब्यांची रेल्वे गाडी आणून चाचणी झाल्यानंतर आता नगर ते आष्टी या साठ किलोमीटर अंतरावर हायस्पीड रेल्वे ( ताशी 144 किमी वेग ) चाचणी झाली आहे. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोलापूर वाडी ते आष्टी या 31 किलोमीटर रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच बारा डब्यांची रेल्वे गाडी धावली .

new railway line in Maharashtra रेल्वे निर्माण विभागाच्या वतीने जोरदार तयारी सुरु आहे.

नगर आष्टी रेल्वे सुरु होणार असल्याने आष्टी तालुक्यातील नागरिक अधिक उत्सुक आहेत .  प्रत्यक्षात ती सुरु होण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles