Homeताज्या बातम्याधनंजय मुंडे : उद्या कोणीही आरोप करेल ,राजीनामा घ्यायचा का? राष्ट्रवादीचे प्रफुल्ल...

धनंजय मुंडे : उद्या कोणीही आरोप करेल ,राजीनामा घ्यायचा का? राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा सवाल

शिर्डी

Ncp praful patel on Dhananjay Munde resign मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर व्यक्ती गत विषयातून  आरोप होत असून त्यांच्या बाबतीत पोलीस विभागाकडून थोडा इशारा जरी मिळाला तरी पक्ष त्याबाबत कारवाई करेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन आज शिर्डी येथे पार पडत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी साई बाबांच्या मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर व्यक्ती आरोप लावत आहे. या बाबतीत पोलीस यंत्रणा आणि एस आय टी ,सी आय डी तपास करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, कोणालाही सोडले जाणार नाही. त्यामुळे हे व्यक्तिगत आरोप होत असून उद्या कोणीही कोणावरही आरोप करेल तेंव्हा काय राजीनामा घ्यायचा का?असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments