nashik graduate constituency election पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान

- Advertisement -
- Advertisement -

पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान
जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत संपन्न

अहमदनगर
nashik graduate constituency election : पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 147 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्धरीतीने व शांततेत पार पडली.

अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लक्ष 15 हजार 638 मतदार होते.

त्यापैकी 43 हजार 206 पुरुष तर 15 हजार 77 महिला अशा प्रकारे 58 हजार 283 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
2 फेब्रुवारी, 2023 रोजी या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मोजणी नाशिक येथे होणार असल्याची माहितीही निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.
तत्पूर्वी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी अहमदनगर शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत मतदान प्रक्रियेची पहाणी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles