nagar beed parli railway बीड परळी पर्यंत रेल्वे मार्ग २०२३ पर्यंत पूर्ण करणार.. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

nagar beed parli railway
nagar beed parli railway

कृष्णा खोऱ्यातील … पाणी मराठवाड्यासाठी आणणारच…

खुंटेफळ साठवण तलावामध्ये उजनी बॅक वॉटर मधून थेट जल वाहिनीद्वारे पाणी सोडणार…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आष्टी वासीयांना आश्वासन…

in article

आष्टी( प्रतिनिधी)
nagar beed parli railway  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील.. आणि महाराष्ट्र राज्यातील भा.ज.पा. शिवसेना युतीचे शासन.. असे डबल इंजिन सरकार सध्या असल्यामुळे आता विकासाची गाडी थांबणार नाही.. स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचे बीड जिल्ह्यातील रेल्वेचे स्वप्न साकार झाले आहे..

हे स्वप्न अपुरे असून परळी पर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण करणे हीच स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांना श्रद्धांजली ठरणार आहे… असे सांगत कृष्णा खोऱ्याचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यासाठी गोदावरी खोऱ्यामध्ये सोडून मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल…

आष्टी तालुक्यात साठी वरदान ठरणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावामध्ये कर्जत तालुक्यातील शेमपुरा येथून उजनीचे बॅक वॉटर चे पाणी उचलून थेट जलद्वाहिनी द्वारे सोडण्याच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगून आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठे आश्वासन दिले.

..
आष्टी येथे दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे वतीने आष्टी ते अहमदनगर या रेल्वे सेवा शुभारंभा वेळी ते बोलत होते… यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, महसूल मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार,आमदार बाळासाहेब आजबे,माजी आमदार भीमराव धोंडे,माजी आमदार शिवाजी कर्डीले, आष्टीच्या नगराध्यक्षा श्रीमती पल्लवी स्वप्निल धोंडे,जयदत्त धस,
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी, उपमहाव्यवस्थापक शैलेंद्र गुप्ता उपस्थित होते…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीड जिल्हा आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे अतूट नाते आहे… आम्हाला त्यांनी राजकारणामध्ये बोटाला धरून मार्गदर्शन केलेले आहे…तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ,खासदार केशरबाई क्षीरसागर, रेल्वे कृती समिती या सर्वांपेक्षा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे या रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण योगदान असून सर्वात जास्त सहभाग त्यांचा राहिलेला आहे…

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने आजवर २००० कोटी रुपये निधी दिला असून त्यामध्ये १८०० कोटी रुपये निधी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेला आहे.. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आत्तापर्यंत १४०० कोटी रुपये निधी दिला आहे त्यातील १२०० कोटी रुपये आपण मुख्यमंत्री असताना दिलेले आहेत .

मध्यंतरी महाविकास आघाडीने राज्य शासनाचा ५० टक्के वाटा उचलण्याचा निर्णय रद्द केल्यामुळे हा प्रकल्प रखडला… परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे राज्य पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर आम्ही हा निर्णय बदलून ५० टक्के वाटा उचलण्यास परवानगी दिली आहे… आणि २५० कोटी रुपये निधी तात्काळ दिला आहे मराठवाड्याच्या विकासासाठी लातूर येथे रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना सुरू केला आहे…

कर्जत तालुक्यातील शेमपुरा येथून उजनीच्या बँकवाँटर मधून जलवाहिनीतून थेट खुंटेफळ साठवण तलावामध्ये पाणी आणण्याच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.. त्यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे… मराठवाड्याच्या हक्काचे सर्व पाणी लवकरच मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले…
यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, माझी राजकीय कारकीर्द.. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांबरोबरच सुरू झालेली आहे.. आम्ही ४२ वर्षे बरोबरीने राजकारण केले… मुंडे साहेबांचे कार्य अतुलनीय आहे…

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे बीड रेल्वेचे स्वप्न परळी पर्यंत रेल्वे पूर्ण करून आपणच पूर्ण करूत .. याची मी सर्वां समक्ष ग्वाही देतो..

२०२४ पर्यंत बीड आणि परळी पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल असे सांगितले… आता लोकांच्या मनातले शासन आले आहे… मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्याशी सतत संपर्क असतो आष्टी ते अहमदनगर हा मार्ग मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र जोडणारा आहे विदर्भ आणि मराठवाडा हे विकासाच्या द्रुष्टीने मागास असल्याने हा भाग रेल्वे मार्गाने जोडल्यास येथील विकास कामे मार्गी लागणार आहेत..

. नगर ते परळी पर्यंत रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन ९६ % पूर्ण झाले असून २०१४ पूर्वी केवळ ६२० किलोमीटर अंतराचे रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण करण्यात आले होते आता ३५०० किलोमीटर विद्युतीकरण पूर्ण झाले असून…
आष्टी ते नगर परळी या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण कामास मंजुरी देण्यात आलेली आहे..

मराठवाड्याच्या विकासासाठी लातूर येथे रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना सुरू केला असून रेल्वे मंत्रालयाने ४०० वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील १२९ वंदे भारत एक्सप्रेस चे डबे हे लातूर येथे तयार होणार आहेत …पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन तंत्रज्ञानाशी सांगड घालून खर्चात बचत केलेली आहे .

तसेच रेल्वे सेवा सुरक्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करून अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.. सर्व योजनांना आता मुबलक निधी मिळणार असल्यामुळे विकासाचा मार्ग खुला झाला असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले…
यावेळी बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले पश्चिम महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीमध्ये बीड जिल्ह्यातील जनतेचे मोठे योगदान आहे आम्ही ते कधीही विसरू शकत नाहीत नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणारे सरकार असून त्यांच्याच मार्गाने राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत आहेत असे सांगितले…
यावेळी बोलताना माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,बीड जिल्ह्यात रेल्वे सेवा शुभारंभ होतो आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या स्वप्नातला हा प्रकल्प सुरू होत आहे ही स्वप्नपूर्ती होत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असूनही शांतता दिसून येत आहे याचे कारण म्हणजे आज या कार्यक्रमाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची हजेरी आवश्यक होती. आज साहेब हवे होते… रेल्वे सेवा ही कोणत्याही पक्षाची नाही परंतु स्वर्गीय मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला होता त्यांची ही स्वप्नपूर्ती आहे याचे खरे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे रेल्वे सेवा शुभारंभाच्या या कार्यक्रमासाठी मला त्यांनी प्रोटोकॉल सोडून या व्यासपीठावर बोलावले आहे हा माझा सन्मान आहे बीड जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे मुंडे साहेबांच्या स्वप्नातला बीड जिल्हा आपणा सर्वांना मिळून घडवायचा आहे असे सांगितले …
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे म्हणाल्या.आष्टी नगर रेल्वे मार्गाच्या शुभारंभाने विकासाचे नवीन द्वार उघडले असून स्वर्गीय मुंडे साहेबांच्या स्वप्नांची पूर्तते चे पहिले पाऊल आहे बीड जिल्ह्यातील जनता गेली पाच दशके या क्षणाची वाट पाहत होती… लोकसभा निवडणुकी वेळी मी उमेदवार असताना नवीन असल्याने कुठलाही अनुभव नसताना… पंतप्रधान नरेंद्र मोदीं समोर भाषण करण्याचा प्रसंग आला…

त्यावेळी मी बीड जिल्ह्यातील जनतेला एकच शब्द दिला होता तो म्हणजे बीड जिल्ह्यात रेल्वे सेवा सुरू करण्याचा.? आणि ही रेल्वे सेवा सुरू करण्याची माझ्या काळामध्ये मला संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो.. या सुवर्णक्षणांचे आपण साक्षीदार झालात याबद्दल सर्वांचेच मनःपूर्वक आभार त्यांनी व्यक्त केले

क्षणचित्र

*रेल्वे सेवा शुभारंभ प्रसंगाने..आ.सुरेश धस,आ.भीमराव धोंडे, यांनी, नगर पंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक,शिंदे गट शिवसेना यांनी संपूर्ण आष्टी शहरातील मार्ग, रेल्वे स्थानक परिसरात …कट आऊट, फ्लेक्स.. लावून ..या कार्यक्रमाला उपस्थित नेत्यांचे स्वागत केले

*पहिले रेल्वे तिकीटाचा मान शहरातील व्यापारी संघटनेचे प्रितम बोगावत यांनी सपत्निक प्राप्त केला..
* कार्यक्रम हा रेल्वे प्रशासनाने आयोजित केला असला तरी आमदार सुरेश धस यांनीच या संपूर्ण कार्यक्रमा वर आपल्या कार्यप्रणाली ची मोहोर उमटवली…
कार्यक्रम पत्रिकेत समावेश नसतानाही.. सर्व प्रमुखांसाठी त्यांनी भोजन व्यवस्था करुन आयोजकाची भूमिका व्यवस्थितपणे…निभावली… आणि नेहमी प्रमाणे आष्टी तालुक्याच्या चर्चेत…राहिले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here