मराठवाडा शिक्षक संघाचे कार्यकर्ता उदबोधन प्रशिक्षण शिबीर बीड येथील कपीलधार येथे उत्साहात संपन्न

marathwada shikshak sangh
marathwada shikshak sangh

मराठवाडा शिक्षक संघाचे कार्यकर्ता उदबोधन प्रशिक्षण शिबीर बीड येथील कपीलधार येथे उत्साहात संपन्न

शिक्षणाला कुचकामी करून व शिक्षकांना गुलाम बनवून कोणताच देश महासत्ता होऊ शकत नाही – राजकुमार कदम

in article

बीड

marathwada shikshak sangh विश्वातील कोणताही देश शिक्षणाला कुचकामी करून व शिक्षकांना गुलाम बनवून महासत्ता होऊ शकत नाही.देश महासत्ता बनण्यासाठी तेथील शिक्षकांचा सन्मान झाला पाहिजे व शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे असे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी उदबोधन शिबिरातील उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षक पदाधिकारी बांधवांना मार्गदर्शन करताना केले.

मराठवाडा शिक्षक संघाचे दोन दिवसीय विभागीय कार्यकर्ता उदबोधन प्रशिक्षण शिबीर बीड जिल्ह्यातील कपीलधार येथे नुकतेच संपन्न झाले.यावेळी संघटनेच्या शिबिरास उपस्थित शिक्षक पदाधिकारी कार्यकर्ते यांना संघटने समोरील आव्हाने,परिणाम व उपाय या विषयावर मार्गदर्शन करताना कदम सर बोलत होते. व्यासपीठावर मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य गोविंदराव कौशल्य,अशोक मस्कले, बंडू अघाव आदिजन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजयालक्ष्मी स्वामी मँडम यांनी केले तर आभार कालीदास धपाटे सर यांनी मानले.

मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव मोर्चाला शिक्षकांचा उदंड प्रतिसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here