mahavitaran news वीज कर्मचाऱ्यांना राज्य शासनाचा शॉक

- Advertisement -
- Advertisement -

 

 

 

 

मुंबई

mahavitaran news राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते,तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगार यांनी संपावर जाऊ नये यासाठी राज्य शासनाने राजपत्रात आदेश काढून मेस्मा लागू केला असल्याचे जाहीर केले.

 

रविवारी रात्री १२ वाजतापासून दोन दिवसीय(२८ आणि २९ मार्च) संपावर जाण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अर्थात *मेस्मा* कायदा लागू केला असून हा प्रस्तावित संप  करण्यास मनाई केली आहे.

महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण mahadiscom news या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा असून या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात  मेस्मा लागू करून त्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे राज्य शासनाने आज राजपत्रात प्रसिद्ध आदेशात म्हटले आहे.

mahavitaran news राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यापूर्वीच राज्यातील वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही,अशी ठाम भूमिका वेळोवेळी घेतली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या वीज क्षेत्राच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांनाही राज्याच्या ऊर्जा विभागाने, राज्य सरकारने तीव्र विरोध केला आहे.mseb rules and regulations in marathi उन्हाळ्यातील वाढलेले तापमान,१० आणि १२ वीच्या परीक्षा,विविध पीकांना पाण्याची असलेली गरज या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अखंड वीज पूरवठा मिळावा म्हणून वीज कंपन्यांच्या अधिकारी- कर्मचारी यांनी संपावर जाऊ नये असे आवाहनही यानिमित्ताने राज्य शासनाने केले आहे.

Miss world 2021 tickets पोलैंडच्या कैरोलिना बीलॉवस्काने जिंकला मिस वर्ल्ड 2021 चा किताब

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles