कडा येथे श्री मच्छिंद्रनाथ ट्रस्ट
कोवीड सेंटरचा आ.सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ
चार दिवसात उभारले १०० बेडचे रुग्णालय
आष्टी : प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील कडा येथे मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव संचलित डॉ. शरद मोहरकर यांच्या देखरेखीखाली १०० बेडच्या कोव्हीड सेंटरचा शुभारंभ विधान परिषदेचे आ. सुरेश धस यांच्या हस्ते संपन्न झाले.
आष्टी तालुक्यातील कडा आणि परिसरातील कोरोना रुग्णांची वाढती गरज विचारात घेऊन श्री मच्छिंद्रनाथ ट्रस्ट सावरगाव यांच्या वतीने कडा येथील अमोलक जैन संस्थेच्या गांधी कॉलेजच्या इमारतीमध्ये १०० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. यामध्ये वीस बेड आयसीयू,तीस बेड ऑक्सिजन, व पन्नास बेड सर्वसाधारण असे उपलब्ध आहेत. कडा येथील कोविड सेंटरची उभारणी ही आष्टी तालुक्यातील नागरिकांना सर्व सोयी-सुविधासह उपलब्ध असल्याने फायदा होईल. बीड जिल्ह्यातील दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी शासनाव्यतिरिक्त वेगवेगळ्या संघटना मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यात आता मच्छिंद्रनाथ संस्थान ने देखील पुढाकार घेतला असून कडा येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये १०० पेक्षा अधिक बेड उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती मच्छिंद्रनाथ ट्रस्टचे सदस्य तथा आ. सुरेश धस यांनी दिली.तसेच रुग्णांची काळजी घेण्यासाठी डॉ.मोहरकर व तज्ञ डॉक्टरांची टीम देखील असणार आहे. याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असून आष्टी तालुक्यातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. या कोविड सेंटरमुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्याचा काळ अतिशय कठीण आहे नागरिकांनी शासनाच्या वतीने वेळोवेळी लागु केलेल्या निर्बंधाचे पालन करावे.असे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले आहे.
यावेळी विजयानंद स्वामी महाराज,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे, डॉ.अनिल आरबे. डॉ.शरद मोहरकर, मच्छिंद्रनाथ संस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे,कोषाध्यक्ष रमेश ताटे, अनिल ढोबळे, युवराज पाटील, योगेश भंडारी, संजय मेहेर, हिरालाल बलदोटा,संजय ढोबळे,हितेश बलदोटा,बाळासाहेब कर्डीले, सुनील रेडेकर,शरद आजबे,सरपंच राजू म्हस्के,दत्ता पाटील,सुनील अष्टेकर आदी उपस्थित होते.
आणखी वाचा:रेमेडिसीवीयर इंजेक्शन आता तालुका स्तरावर मिळणार, बीडला जाण्याची आवश्यकता नाही
“अमोलक”चा उदारपणा
कडा येथे मच्छिंद्रनाथ देवस्थान च्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या कोविड रुग्णालयास अमोलक जैन शिक्षण विद्या प्रसारक मंडळाने तीन मजली सुसज्ज अशी इमारत देऊन एक प्रकारे खुप मोठा उदारपणा दाखवला असून त्यांनी आजपर्यंत अनेक सेवा कामे केली आहेत तसेच आताही रुग्णासाठी संपूर्ण इमारत देऊन उदारपणा दाखवला असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले…