- Advertisement -
- Advertisement -
अकोले,
सहयाद्रीच्या डोंगर दऱ्याखोऱ्यातील शाळा, वस्त्या मध्ये लोकशाहीर संभाजी भगत दादांच्या पहाडी आवाजात, आदरणीय शिवाजी नाईकवाडी यांच्या कृतीशील गाणी-खेळामधून, भारत आणि गणेश यांच्या सोबतीने माणूसकीची शाळा दूमदूमली.
अकोले तालुक्यातील बारी,वारंघूशी, राजूर (राहूल नगर),श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर.श्री समर्थ माध्यमिक विद्यालय, मवेशी.
या सर्व ठिकाणी विद्यार्थी वर्ग, ग्रामस्थ, काही पालक यांनी माणुसकीचे धडे समजावून घेतले.
माणूसकीची प्रार्थना, मनाला स्वच्छ आणि स्वस्थ करणारी गाणी,,मनाची-बूध्दीची एकाग्रता साधणारे खेळ यात सगळ्या लहान थोरांची उत्साहाने सहभाग घेतला.
नको रे जात,नको रे धर्म, नको रे पंथ, नको कोणाला टोचून बोलणे, कोणाला उपहासात्मक हासणे- बोलणे नको,
कोणी मालक नाही,कोणी चाकर नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही.कोणाला पैसे देणे नाही, कोणाचे पैसे घेणे नाही.आमची एकच जात–माणूस,आमचा एकच धर्म–मानवता.
माणसा तू फक्त जागा होरे, माणूस म्हणून जगताना माणवता धर्माच पालन कर.असा संदेश देणाऱ्या माणूसकीच्या शाळेने सगळयांना भारावून टाकले.
मवेशीच्या शाळेत जाता जाता माणूसकीच्या दूतांना उशीर झाला.तेथील विद्यार्थी विद्यार्थीनींना भूकेने व्याकूळ झालेले असतील, उपाशी पोटी या बालमनाला उपदेशाचे डोस पाजण्यात अर्थ नाही हे माणूसकीचे दूत गहीवरले आणि स्वतः पैसे खर्च करून प्रत्येक विद्यार्थ्याला एक बिस्कीट पूडा दिला, बिस्किटे खाऊ घातली, पाणी पिण्यास सांगितले.(येथे कर माझे जुळती आणि मग माणूसकीच्या शाळेला सूरूवात झाली.
हे आहे मानवते दशर्न आणि ही आहे संवेदनशीलता बारी,वारंघूशी,राजूर ,मवेशी या परीसरातील सर्वच माणसाच्या वतीने मी मिशन माणुसकी चे शतशः आभार जय भारत जय संविधान मानते.असे सौ .कल्पना थोरात म्हणाल्या.
प्राचार्या सौ . मंजुषा काळे . मुख्याध्यापक विलास महाले , स्कूल कमिटीचे बांबळे , सरपंच सौ बांबळे व आदिवासी ग्रामस्थांनी शाळा माणुसकीची मध्ये सहभाग नोंदविला.
लोकशाहीर संभाजी भगत यांच्या सहभागाने नागरिकांना वेगळा आनंद मिळाला.
हेही वाचा :राज्यात शाळाबाह्य मुलांचे मार्च मध्ये होणार सर्वेक्षण
[…] हेही वाचा :ना जातीची ना धर्माची आमची श… […]