प्रबुद्ध विचारक प. पू. श्री. आदर्शऋषीजी म. सा. यांच्या उपस्थितीत कडा येथे बायसा व जमाईसा सन्मान सोहळ्याचे आयोजन


कडा

येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळामध्ये जैन धर्माचे राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांचे शिष्य प्रबुद्ध विचारक परमपूज्य श्री आदर्श ऋषीजी महाराज यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकारी यांनी दिली आहे .

शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात परमपूज्य आदर्शऋषीजी महाराज यांच्या उपस्थितीत कडा येथील बायसा व जमाईसा यांचा तसेच ज्येष्ठ श्रावक आणि श्राविका यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचवेळी अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेच्या इमारतीचे तसेच मुलांच्या आणि मुलींच्या वस्तीगृहाचे बांधकाम करण्याचा संकल्प आदर्श ऋषीजी म. सा. यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. तसेच बोर्डींगच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला आहे.


या समारंभासाठी प. पू. आदर्श ऋषीजी म. सा. यांच्यासह प. पू. उपप्रवर्तक अक्षय ऋषीजी महाराज, प. पू. अमृत ऋषीजी म. सा. प. पू. गीतार्थ ऋषीजी म. सा. तसेच महासतीजी उदय प्रभाजी महाराज आदी ठाणा, महासतीजी विपुल दर्शनाजी म. सा. आदी ठाणा हेही उपस्थित असणार आहेत.


शनिवारी होत असलेल्या या कार्यक्रमांमध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत कार्यक्रम असणार आहेत यामध्ये सकाळी विविध वेशभूषेमध्ये मोतीलाल कोठारी विद्यालयातील विद्यार्थी तसेच संस्थेच्या सर्व विभागातील विद्यार्थी यांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली नंतर संस्थेच्या प्रांगणात परमपूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर जैन धर्मातील ज्येष्ठ श्रावक आणि श्राविका यांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच या प्रसंगी संस्थेच्या बोर्डींग मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला आहे.


या कार्यक्रमासाठी कडा शहरातील श्री वर्धमान स्थानकवाशी जैन श्रावक संघ, अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ आणि वर्धमान महावीर ट्रस्ट संचलित इंग्लिश स्कूल कडा यांचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. परमपूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांचा कडा शहरांमध्ये तीन दिवस आगमन असणार असून शुक्रवारी श्री वर्धमान महावीर ट्रस्ट संचलित इंग्लिश स्कूल कडा येथेही महाराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


या सन्मान सोहळ्यासाठी जास्तीत जास्त बहीणी, जावई तसेच ज्येष्ठ श्रावक-श्राविका आणि माजी विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles