कड्याच्या जैन जिमखाना कडाने राज्यस्तरीय बास्केटबॉल चषक जिंकला!

जैन जिमखाना

कड्याच्या जैन जिमखाना कडाने राज्यस्तरीय बास्केटबॉल चषक जिंकला

कडा दि 25 जानेवारी, प्रतिनिधी

चाळीसगांव जिल्हा जळगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत कडा येथील जैन जिमखानाने कोल्हापूर च्या प्रिन्स अकॅडमीचा पराभव करून राज्यस्तरीय चषक आणि 25 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.

in article

IMG 20210124 WA0073

चाळीसगांव जिल्हा जळगाव येथे वाय एन चव्हाण कॉलेज ने निमंत्रित संघासाठी राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी राज्यातील 24 संघ सहभागी झाले होते.
जैन जिमखाना संघाचे नेतृत्व सचिन इटकर याने केले.प्रिन्स अकॅडमी कोल्हापूर आणि जैन जिमखाना कडा, बीड यांच्यात झालेल्या अंतिम  सामन्यात कडा ने प्रिन्स वर 76-51 ने मात करत 25 गुणाने  पराभव केला.यापूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात कडा ने औरंगाबाद संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.
चाळीसगांव येथील वाय एन चव्हाण महाविद्यालयात झालेल्या कॉलेजमध्ये 25 हजार रुपये आणि चषक या संघाला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

IMG 20210124 WA0074
या संघाचे कोच प्रा. जमीर सय्यद आणि प्रशिक्षक सचिन आळकुटे यांनी  संघाला मार्गदर्शन केले.विजेत्या संघातील खेळाडू सचिन इटकर कर्णधार,सकलेन सय्यद,मिथुन दास,अजय पवार,अक्षय खरात,आफताब सय्यद,साहिल धनवडे, गणेश कुसळकर, सागर धनवटे, स्वप्निल ढोबळे,श्री हर्षा, हे आहेत.

हेही वाचा:गोंदियात नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला नक्षल साहित्यासह ५०० च्या जुन्या नोटा जप्त

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here