रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 95 % वर,

- Advertisement -
- Advertisement -

 

 

 

नवी दिल्ली दि.१५ ,प्रतिनिधी

कोरोना विरोधातल्या लढ्यात भारताने अनेक महत्वाचे टप्पे साध्य केले आहेत.

गेल्या 24 तासात पुष्टी झालेल्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या 22,100 च्या खाली गेली आहे. 161 दिवसानंतर दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 22,065 झाली आहे. 7 जुलै 2020 ला नव्या रुग्णांची संख्या 22,252 होती.

 

दर दिवशी बऱ्या होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे आणि सातत्याने कमी होणाऱ्या मृत्यू दरामुळे सक्रीय रुग्ण संख्या कमी होण्याचा भारताचा कल कायम राहिला आहे.

आणखी एका कामगिरीद्वारे सक्रीय  संख्येत मोठी घट होत ही संख्या 3.4 लाखापेक्षा कमी झाली आहे. देशातल्या एकूण सक्रीय रुग्णांची सध्याची संख्या 3,39,820 असून ती एकूण रुग्ण संख्येच्या 3.43 % आहे.

 

सक्रीय रुग्ण संख्येत घट होण्याबरोबरच कोरोना  बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ नोंदवली जात आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या 94 लाखापेक्षा जास्त झाली आहे (94,22,636). सक्रीय  आणि बरे झालेले यांच्यातले अंतर सातत्याने वाढत असून ते 90,82,816 झाले आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर आणखी सुधारला असून तो 95.12% झाला आहे.

 

रुग्ण संख्या जास्त असलेल्या देशामध्ये बरे होण्याचा दर सर्वाधिक असलेल्या देशांपैकी भारत एक आहे.

 

गेल्या 24 तासात देशात 34,477 र कोरोनातून बरे झाले.

बरे झालेल्यां रुग्णापैकी 74.24%  10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

बरे झालेल्यांची एका दिवसातली सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली असून इथे एका दिवसात 4,610  बरे झाले. केरळमध्ये ही संख्या 4,481 तर पश्चिम बंगाल मध्ये ही संख्या 2,980 होती.

 

नव्या रुग्णांपैकी 73.52%  10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशात आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 2,949 दैनंदिन रुग्णांची नोंद झाली असून केरळमध्ये 2,707 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात 354 मृत्यूंची नोंद झाली.

या पैकी सुमारे 79.66% मृत्यू 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन प्रत्येकी 60 मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल मध्ये 43 मृत्यूंची नोंद झाली.

हेही वाचा :मुख्यमंत्र्याच्या वर्षा शासकीय निवासस्थानाचे पाणी बिल थकीत नाही-मुंबई महापालिकेचा अहवाल

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles