कोरोनाने माणुसकी हरवली;मुस्लिम युवकांनी जागविली !
सांगली दि 3 मे ,प्रतिनिधी
कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथील एका वृद्ध महिलेचे कोरोनाने दवाखान्यात निधन झाले.महिलेचा गावात अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी नकार दिला.मात्र अंत्यसंस्कार कुठे करणार ?हा प्रश्न या कुटुंबियांच्या समोर होता.त्यांच्या मदतीला मुस्लीम बांधव आले आणि त्यांनी हिंदू अंत्यसंस्कार पध्दतीने वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार केले.कोरोनाने गावातील लोकांची माणुसकी हरवली खरी पण मुस्लीम युवकांनी जागविली असेच म्हणावे लागेल.
नागज तालुका कवठेमहांकाळ येथील मंगल शिंदे यांचे रूग्णालयात निधन झाले.त्यांनतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांची सून तेजश्री शिंदे यांनी गावाकडे फोन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार साठी विचारणा केली मात्र गावकऱ्यांनी याला स्पष्ट नकार दिल्याने आता कुठे अंत्यसंस्कार करणार हा प्रश्न होता पण
हाफिज सदाम सय्यद,सुफीयन पठाण, मुफ्ती सादिक पटेल या युवकांनी पुढाकार घेत मंगल शिंदे यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.
धार्मिक विषय बाजूला ठेवून दाखवलेली ही माणुसकी कधीही विसरता येणार नाही कोरोनाच्या या महा मारीत एक मुस्लीम कुटुंबच हिंदू कुटुंबाच्या मदतीला आले.
हे युवक जमियत ए उलमा मदनी या संघटनेचे सदस्य असून ही संस्था सामाजिक कार्य करते.माणुसकीला सलाम करावा असेच काम मुस्लीम बांधवांनी केले. कोरोनाबाधित महिलेवर हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईक व नागज येथील स्थानिक गावकऱ्यांनी सदरचा अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे मुस्लीम बांधव त्यासाठी सरसावले. जमियत ए उलमा, मदनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर
अंत्यसंस्कार केला.ह्या कृतीने निश्चितच कोरोनाने हरवलेली माणुसकी युवकांनी जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला .त्यांचा आदर्श समाजाने घ्यायला हवा.
डॉक्टर्सची सेवा कमी पडली तर खासगी डॉक्टर्स ची सेवा घेऊ :नामदार धनंजय मुंडे