अकोले प्रतिनिधी
तालुक्यातील 51 ग्रामपंचायत निवडणुकीत समिश्र निकाल आले असुन भाजप व महाविकास आघाडीकडुन ग्रामपंचायत सत्तेबाबद दावे प्रतिदावे करण्यात आले आहे.
अकोले तालुक्यातील ५२ ग्रामपंचायत निवडणूक लागलेली होती त्यापैकी १ ग्रामपंचायत उमेदवार अर्ज न आल्याने रद्द झाली तर १५ ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध होऊन.१५ जानेवारी रोजी झालेल्या ३६ ग्रामपंचायत निवडणूकीचा आज निकाल जाहीर करण्यात आला आहे .यावेळी अनेक ग्रामपंचायतीत तरुण उमेदवारांनी बाजी मारली तर अनेक ठिकाणी सत्तांतर झाले असल्याचे पहायला मिळाले.
ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षीय बलावर न होता काही ठिकाणी भाजप -सेना तर काही ठिकाणी भाजपचे दोन गट तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत होते.
नगर जिल्ह्यात 86 रूग्णांना डिस्चार्ज;131 नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर
१५ जानेवारी रोजी ३६ ग्रामपंचायतचे मतदान होऊन आज सकाळी तहसिलकार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. सहा फेरीत मतमोजणी करण्यात आली यामध्ये प्रत्येक फेरीत ५ ते ७ गावाची मतमोजणी करण्यात आली.पहिल्या फेरीत मतमोजणी झालेल्या गावांची प्रतिनिधी बाहेर आल्यावर दुस-या गावातील उमेदवार प्रतिनिधी आत सोडले जात होती. याप्रसंगी निवडून आलेले उमेदवारांचे प्रतिनिधी आतुन बाहेर येतानाच जल्लोष करत येत होते.
सकाळ पासून जसजसे मतदानाचे कल येत होते तसतसे गावगावातील कार्यकर्ते जल्लोष करत गुलालाची उधळण करत होते.यावेळी अनेक धक्कादायक निकाल लागले असुन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव यांच्या नेतृत्वातील पॅनलचा आंबड ग्रामपंचायतीत दारूण पराभव झाला तर जिल्हा परिषद सदस्य व माजी आ.वैभवराव पिचड समर्थक कैलासराव वाकचाैरे यांनी कळस बु ग्रामपंचायत तर माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांनी देवठाण ग्रामपंचायत व जि.प.भाजप गटनेते जालिंदर वाकचाैरे,दुध संघाचे व्हा चेअरमन रावसाहेब वाकचाैरे यांच्या विरगाव ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीच्या पॅनल दारूण पराभव करत सत्ता मिळवली.
तसेच तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोतुळ ग्रामपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली असताना माजी जि.प.उपाध्यक्ष सीताराम पा देशमुख, राजेंद्र देशमुख, सयाजी उर्फ सुभाष देशमुख यांचे पॅनलने १४ विरूद्ध ०३ असा विजय मिळवत जिल्हा परिषद सदस्य रमेशराव देशमुख यांच्या पॅनलचा पराभव केला.धुमाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे जेष्ठनेते शिवाजी धुमाळ व शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांच्या एकञित पॅनलने विजय मिळवला. धामणगाव आवारी ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य अप्पा आवारी व भाजपाचे बाळासाहेब भोर यांच्या पॅनलने बाजी मारली याठिकाणी पञकार गणेश आवारी यांनी उभा केलेल्या तिसऱ्या आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.उंचखडक बु येथे अशोक देशमुख पॅनलने भाऊसाहेब खरात व प्रतापराव देशमुख पॅनलचा ०४ विरूध्द ०३ असा विजय मिळवला येथे दोन्ही मा.आ. पिचड गटातच निवडणूक लढत झाली.
विशेष
भाजपा नेते जिल्हा बॅक अध्यक्ष सीताराम पाटील गायकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील
ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतीत देवराम अप्पा गायकर यांचे ग्रामविकास मंडळ चे सर्वच्या
सर्व उमेदवार विजयी झाले व बदगी ग्रामपंचायतीतही श्री गायकर याचे कार्यकर्ते
भूषण शिंगोटे यांच्या पॅनलने विजय मिळवला.
तालुक्यातील बिनविरोध व सार्वञिक निवडणूक झलेल्य एकुण ५१ ग्रामपंचायती पैकी
महाविकास आघाडीने ३८ ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली असल्याचा दावा विद्यमान
आमदार डॅा.किरण लहामटे यांनी केला आहे.तर ५१ ग्रामपंचायतीपैकी ४५
ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवले असल्याचा दावा
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सीताराम पा भांगरे यांनी केला आहे.
पराभूत उमेदवारानीच घेतला गुलाल…!
धुमाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा आज सकाळी निकाल जाहिर होताना
साै.आशा शिवाजी धुमाळ यांचा विजय झालेला असताना विरोधी
पराभूत उमेदवार सुवर्णा अजय वर्पे यांचे पती व उमेदवार प्रतिनिधी
असलेले श्री अजय वर्पे यांचा निकाल पाहण्यात अथवा एकण्यात
गल्लत झाल्याने त्यांनी विजयी झाल्याचे समजून गुलाल उधळत
आनंद व्यक्त केला तर याप्रकाराने विजयी उमेदवाराचे पती शिवाजी धुमाळ
हे गोंधळून गेले होते. त्यांनी थोड्या वेळात पुन्हा श्री वर्पे यांना
तहसिल कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे जावून चाैकशी करण्यास
घेऊन गेले असता घडलेला प्रकार समोर आल्याने पराभूत झालेले
असतानाही गुलाल खेळल्याची जाणिव वर्पे यांना झाली तर त्यानंतर
विजयी उमेदवार धुमाळ यांनी गुलाल खेळून आनंद व्यक्त केला.
देवठाण ग्रामपंचायतीत तरुणांसह गावकऱ्यांनी युवा नेतृत्व अरुण शेळके
यांच्यावर विश्वास टाकत १६ विरूद्ध ०१ अशी ग्रामपंचायत सत्ता
ताब्यात दिली.यानिवडणुकित गावातील सर्व पक्षाचे सर्व पुढारीनी
अरुण शेळके या युवानेतृत्वाचे विरोधात पॅनल दिला होता.
या विजयानंतर पञकारांशी बोलताना शेळके म्हणाले हि निवडणूक
ग्रामपंचायतीची होती विधानसभेची निवडणूक नव्हती यानिवडणुकीत
गावात येवून विद्यमान आमदारांनी प्रचार करणे योग्य नाही व ते शोभा
देत नाही माञ विद्यामान आमदार डॅा.लहामटे यांनी आमच्या गावात
येवून आमच्या पॅनल विरोधात प्रचार केला माझ्याविषयी वयक्तीक
बदनामी केली माञ उलट ज्या ज्या वार्डात आमदार प्रचाराला गेले
त्या त्या वार्डात आमच्या उमेदवारांना उच्चांकी मतदान मिळाले
यावरूनच आमदराची लोकप्रियता कळते असा आरोप शेळके यांनी केला.