gram panchayat election 2022 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

- Advertisement -
- Advertisement -

 

मुंबई,

gram panchayat election 2022  राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.

राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.

त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल.

प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे – 35, पालघर – 62, रायगड – 191, रत्नागिरी – 163, सिंधुदुर्ग – 291, नाशिक – 188, धुळे – 118, जळगाव – 122, अहमदनगर – 195, नंदुरबार – 117, पुणे – 176, सोलापूर – 169, सातारा – 259, सांगली – 416, कोल्हापूर – 429, औरंगाबाद – 208, बीड – 671, नांदेड – 160, उस्मानाबाद- 165, परभणी – 119, जालना – 254, लातूर – 338, हिंगोली – 61, अमरावती – 252, अकोला – 265, यवतमाळ – 93, बुलडाणा – 261, वाशीम – 280, नागपूर – 234, वर्धा – 111, चंद्रपूर – 58, भंडारा – 304, गोंदिया – 345, गडचिरोली- 25. एकूण – 7,135.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles