Gandhi jayanti special :गांधीजीं स्मृती जतन करणारे गाव

- Advertisement -
- Advertisement -

Gandhi jayanti special :गांधीजींच्या विचारांची स्मृती जपवणूक करणारे गाव

मनोज सातपुते

Gandhi jayanti special :देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये अनेकांनी आपला नोंदवला.प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वातंत्र्याची विचारधारा जोपासणारी अनेक माहित नसलेल्या गोष्टी दृष्टीआड आहेत.

स्वातंत्र्य संग्राम दूर होता मात्र प्रत्यक्ष गांधीजींच्या विचारांचे वारे या गावात वाहत होते.म्हणूनच आजही या गावाला ‘गांधीजींचे गाव’Mahatma gandhi village म्हटले जाते.

अहमदनगर- सोलापूर महामार्गावर घोगरगाव आहे.इथून अर्धा किमी अंतरावर कोंभळी फाटा आहे.उजव्या बाजूला दिसणाऱ्या या फाट्यापासून दहा किमी अंतरावर पुढे गेल्यावर कोंभळी गाव सुरु होते.

रस्ता तसा चांगला झालेला त्यामुळे नगरपासून साधारणतःतासाभरात इथे पोहचता येते.

Gandhi jayanti special:काय आहे गांधीजींच्या गावाची काय आहे संकल्पना?

 

जेमतेम दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेले हे गाव.शेती हे येथील मूळ व्यवसाय. पारंपारिक शेती करत शिक्षण करणे आणि त्यातून आपला उत्कर्ष साधणे हे येथील गावकऱ्यांचे ध्येय. दुष्काळी टप्प्यातील असल्याने पाऊसमान कमीच त्यामुळे शेतीवर अवलंबून न राहता येथील नागरिकांनी शिक्षणाला आपलेसे केले.

शिक्षणाची गंगा या गावात आली ती गांधीजींच्या विचाराने.1942 मध्ये एक शिक्षकी असलेली शाळा स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत पाच ते सहा शिक्षक पर्यंत पोहोचली. त्यावरून गवत शिक्षणाला किती महत्व असावे याचा अंदाज येतो.

गाव तसे साधारणच, पण वेगळ्या वैशिष्ट्ये मुळे हे गाव अचानक प्रकाशझोतात आले. इतर गावांप्रमाणे इथेही सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्यासाठी देवादिकांचे मंदिरे आहेत.परंतु आगळेवेगळे मंदिर इथे पहावयास मिळते ते म्हणजे महात्मा गांधीजींचे.mahatma gandhi temple येथील गांधीजींच्या mahatma gandhi पूर्णाकृती पुतळ्याने गावाला गांधीजींचे गाव म्हणून नाव पडले.

गावातील जिल्हा परिषद शाळेत गांधीजीच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न होतोय.त्यासाठी खास सर्वोदय मंदिरही gandhi temple बांधण्यात आले.या मंदिरात गांधीजींचा ६ फुट उंचीचा पूर्णाकृती पुतळा गेल्या ६६ वर्षापासून उभा आहे.त्यामुळे गांधीजींचे मंदिर असलेले हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. शाळेचे कार्यालय याच मंदिरात आहे.

mahatma Gandhi temple
mahatma gandhi temple in ahmednagar kombhli

शाळेची घंटा वाजली कि,सर्व मुले या मंदिराच्या समोर जमतात.दैनदिन प्रार्थना म्हणताना,गांधीजींचे भजने सुरु होतात.शाळेची दैनिक सुरुवात गांधीजींच्या दर्शनाने होते.

याबाबत आणखी माहिती देताना येथील जुन्या पिढीतील शिक्षक नाना गांगर्डे गुरुजी म्हणाले कि, “गावातील या शाळेत आम्ही शिकत असताना संपूर्ण शाळा सुत कातत असे.1942-43 मध्ये गावात प्राथमिक शाळा सुरु झाली. त्यावेळी मुलोद्यागी शिक्षणाला प्राधान्य असल्याने शिक्षकांनी सुत काताण्याच्या swadeshi अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले होते.आम्ही सर्व सुत कातायचो. परिसरात ही शाळा सर्वाधिक सुत तयार करणारी शाळा म्हणून नावलौकिक होता.इथे चरखे होते, cotton हातमाग होते आणि टकळीही होती.मुलोद्योगी swadeshi शाळा म्हणून जिल्हाभरात नावाजलेली होती.हे सर्व कातलेले सुत वर्ध्याला पाठवले जाई. त्यापूर्वी कोपरगाव येथे स्पर्धा असे. ज्यांचे सुत चांगले त्या शाळेला बक्षीस मिळत असे”. तसे अनेक बक्षीस शाळेला मिळाले आहेत.प्रमाणपत्रेही शाळेत उपलब्ध आहेत.

Gandhi jayanti special : swadeshi, mahatma gandhi temple सुतयज्ञ

शाळेत सुत यज्ञ असे. म्हणजेच २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या gandhi jyanti दिवशी या सुत यज्ञाला सुरवात होत असे. ते थेट 10 ऑक्टोबर पर्यंत तो चाले. या कालावधीत मुले रात्रंदिवस swadeshi सुत कातण्याचे काम करत असे. याबाबत अधिक माहिती देताना नाना गांगर्डे म्हणाले कि, “ह्या आठ दिवसात तयार झालेले सुत ३० जानेवारी ते 12 फेब्रुवारी या काळात होणाऱ्या प्रदर्शनात मांडले जाई. ३० जानेवारी हा गांधीजींचा स्मृती दिन ते 12 जानेवारी पर्यंत स्मृतीदिन साजरा केला जात असे. या काळात परिसरातील सुत swadeshi काताणाऱ्या शाळांना कोंभळी गावात बोलावले जाई. शेजारील मिरजगाव, कर्जत, खांडवी येथील शाळा येत असत.सर्व शाळांनी केलेल्या सुत गुंड्या गांधीजींना अर्पण केल्या जात असत. गावात प्रभात फेरी काढली जात असे. सर्व मुले गावकरी यामध्ये सहभागी होत.या काळात मुले श्रमदान करण्यासाठी जवळच्या तलावावर जात होते. शेवटच्या दिवशी 12 फेब्रुवारीला गांधीवादी mahatma gandhi temple विचारवंत आणि माजी मंत्री बाळासाहेब भारदे यांचे प्रवचन असे.त्यांनी सलग 10 वर्षे या गावात येऊन प्रवचन केले. 1952 साली दुष्काळ पडला होता शाळेतील मुले जवळच्या तलावावर जाऊन इतरांबरोबर श्रमदान करत होती. त्याकाळी असेलल्या ग्राम शिक्षण अधिकारी यांनी या मुलांचे मोल फुकट न घेता त्यांना ५०० रुपये दिले. ते ५०० रुपये आणि मुलांनी हाताने भारताचा नकाशा असलेली सतरंजी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जवळच्या गुरवपिंपरी येथे दुष्काळाची पाहणी करायला आल्यानंतर त्यांना भेट दिली. त्यानंतर शिक्षण मंत्री हितेंद्र देसाई यांनी शाळेला भेट देऊन शाळेचे कौतुक केले होते.”

mahatma Gandhi temple

त्याकाळी गाव गांधीजींच्या mahatma gandhi swadeshi विचाराने भारावलेले होते.खादी हा विचार गावात रुजला होता.खादी हीच प्रेरणा घेऊन शाळा आणि गाव पुढे जात होते. हीच प्रेरणा पुढील पिढीला मिळावी यासाठी मुलांच्या हातात चरखा देण्यात येत होते.मुलेही आनंदाने स्वीकारत करत असत. त्यातूनच गांधीजींच्या मंदिराची संकल्पना पुढे आली तत्कालीन शिक्षक लोखंडे यांनी सुतस्पर्धेला गेल्यानंतर कोपरगाव येथे त्या प्रदर्शनात गांधीजींचा पुतळा पहिला आणि तसा पुतळा बसविण्यासाठी राजस्थान मधून कारागीर बोलावले. ह्या कारागिरांनी सहा महिने काम करून गांधीजींचा पुतळा तयार केला. हा पुतळा संपूर्ण संगमरवरी आहे.त्यानंतर या पुतळ्यासाठी गावातील गांधीवादी कार्यकर्ते चंदनमल भळगट यांनी सर्वोदय मंदिर mahatma gandhi temple बांधले ते वर्ष होते 1954-55.

Gandhi jayanti special 2021:गावाला मोठी शाळा लाभली आहे. साडेचार एकर क्षेत्रावर शाळा आहे.त्यापैकीच काही भागावर हातमागाच्या कार्यशाळा होत्या. त्यामध्ये हातमाग, चरखे होते. मुलोद्योगी तासाला सर्व विद्यार्थी तिथे जाऊन सुत कातण्याचे काम, चरखा चालवणे, हातमाग शिकणे यासारख्या गोष्टी शिकत. मात्र काळाच्या ओघात या सर्व वस्तू आणि वास्तू नामशेष झाल्या. मोठ्या खोल्यात अडगळीत पडलेले चरखे आणि हातमाग याची विलेह्वाट लावण्यात आली. त्यामुळे आज इथे एकही चरखा दिसत नाही.मात्र येथे तयार केलेल्या सुताच्या गुंडाळ्या इथे आजही पहावयास मिळतात. त्याची जपवणूक करून ठेवली आहे. मात्र इतर वस्तू नसल्याची खंत येथील शिक्षकांना वाटते.

आजही या गावातील नागरिक Gandhi jayanti special : गांधी जयंती, ३० जानेवारी गांधीजींचा स्मृतिदिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी शाळेत मोठ्या संखेने जमतात. गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेतात. त्यामुळे नवीन पिढीला या गांधीजींच्या विचारांची ओळख होते.

आणखी वाचा :नवनिर्वाचित खासदार रजनी पाटील यांचा अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांशी संवाद 

स्वातंत्र्य संग्रामात या गावाचा तसा थेट संबंध नव्हता कि, येथील कोणी संग्रामात भाग घेतला,मात्र गांधीजींची विचारधारा या गावात रुजली.येथील सर्वोदय मंदिर mahatma gandhi temple गावकऱ्यांसाठी राजघाटच आहे.15 ऑगस्ट 1947 ला संपूर्ण गाव जागे होते. गावातील लहानथोर रात्री पासून ढोल ताशे च्या गजरात नाचत होते, गुलाल उधळून स्वातंत्र्याचा जयघोष करत होती. तो दिवस अजूनही आपण विसरू शकत नसल्याचे नाना गुरुजी यांनी सांगितले.

गांधीजींचा आदर त्यांची पूजा करणे आणि प्रार्थना करणे हेच येथील विद्यार्थ्यांचे काम असे.दररोज प्रार्थना होत असे आजही इथे गांधीजींच्या mahatma gandhi temple प्रार्थना विद्यार्थी दररोज म्हणतात.

Gandhi jayanti special 2021,गांधीजींनी मूलोद्योगी शिक्षणाचा मंत्र दिला आणि जगण्याची तालीम दिली.या गांधीजींच्या मूल्यांची रुजवणूक होत आहे. याबाबत माहिती देताना गावचे सरपंच कुंडलिक गांगर्डे यांनी सांगितले की ,दरवर्षी गावात गांधी जयंतीच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता ,वृक्षारोपण यासारखे उपक्रम हाती घेतले जातात. पण आता मंदिर बंद आहे.

swadeshi
here is mahatma temple which is known as sarvoday temple

गावातील मुलांना लहानपणापासून गांधीजींच्या विचारांची ओळख होते. मंदिरात शाळा भरत असल्याने मुलांना दररोज गांधीजींचे दर्शन मिळते. आता शाळा बंद असल्याने हे मंदिर बंद आहे. आजही गावातील कार्यक्रमाची सुरुवात या गांधीजीची पूजा करून होत,तर लग्नासारखे समारंभ झाल्यानतर नव वधू-वर आपल्या संसाराची सुरुवात या गांधीजींचे दर्शन करून करतात.या गावाने आजही गांधीजींच्या विचारांचा वारसा जपला आहे.

Gandhi jayanti special 2021,गावात गांधीवादाची परंपरा असल्याने सर्व गावकरी समन्वयाने आपल्या अडचणी सोडवतात.याबाबत अधिक माहिती सांगताना निवृत्त शिक्षक सोपानकाका गांगर्डे यांनी सांगितले कि, “गावात गांधीजींच्या विचारांचा आदर केला जातो, इथे वाद होतात मात्र सामोपचाराने मिटले जातात.गावाच्या एकीला तडा जाणार नाही अशी वागणूक करण्यावर गावकऱ्यांचा भर असतो.सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केले जाते .गावात शिक्षणाचे प्रमाण चांगले असल्याने प्रत्येक घरातील कोणी न कोणी नोकरीस आहेत.ही गांधीजींच्या विचारांची देणगी म्हणावे लागेल,”

या गावांचा आदर्श आता इतर गावातील नागरिक घेत आहेत.

Gandhi jayanti special ,देश गांधीजींच्या १५१ व्या जयंती साजरी करत आहे.त्या निमित्ताने गावकऱ्यांनी गांधीजींच्या विचारांचे दृढीकरण करण्याचे ठरवले आहे.

इतनी शक्ती हमे दे न दाता;
मन का विश्वास कमजोर हो न…..

हे स्वर पुन्हा कानी पडण्यासाठी आणि गांधीजीच्या गावाला जाण्यासाठी काही काळ वाट पहावी लागेल.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles