स्वर्गीय बाबूजी आव्हाड यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी

बाबूजी आव्हाड

स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार बाबूजी आव्हाड यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी – खासदार डॉ.सुजय विखे पाटील

पाथर्डी दि.31 मार्च ,प्रतिनिधी

in article

स्वर्गीय स्वातंत्र्यसेनानी व माजी आमदार बाबूजी आव्हाड यांचे जीवन चरित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. बाबूजींनी तालुक्याच्या विकासासाठी बहुमोल योगदान दिले आहे ते कधीही विसरणार नाही.

पाथर्डी तालुक्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मार्फत योजना कार्यान्वित करण्याचा आपला मानस असून योजनांच्या पूर्ततेसाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

पाथर्डी येथे थोर स्वतंत्र सेनानी व माजी आ स्व.बाबूजी आव्हाड यांच्या १००व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन सोहळ्या प्रसंगी डॉ.सुजय विखे पाटील बोलत होते यावेळी जेष्ठ नागरिकांचा सत्कार व गरजू नागरिकांना छत्री, गरजू विद्यार्थीनीनां मोफत सायकल चे वाटप खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ मृत्यूजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, अभय काका आव्हाड,कॉब्रेड कावा शिरसाठ,ऍड विश्वासराव आठरे, गजानन कोष्टी, ऍड सुरेश आव्हाड, अजय रक्ताटे, नगरसेवक प्रसाद आव्हाड ,बंडू बोरूडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

आणखी वाचा: कड्याच्या अँटिजेंन चाचण्यात 14 निघाले पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here