कृषी पंपाची थकबाकी भरताय का ? थांबा हे वाचा

- Advertisement -
- Advertisement -

 

31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषी पंपाची 70% थकबाकी भरली तर एकूण बिलात 30 टक्के सवलत मिळणार आहे. 2020 पासून ही योजना सुरू असून या हे या योजनेचे दुसरे  वर्ष आहे.

electricity bill of the agricultural pump
electricity bill of the agricultural pump

महावितरण च्या वतीने कृषी पंप शेतकऱ्यांसाठी कृषी धोरण 2020 राबविण्यात येत आहे. मागील वर्षी ही योजना सुरू झाली होती. तीन वर्षासाठी राबवण्यात येत असलेल्या या योजनेचे दुसरे वर्ष आहे. दुसऱ्या वर्षाची मुदत येत्या 31 मार्चला संपणार आहे. अनेक शेतकऱ्यांकडे वीज बिल थकीत आहेत. त्यामुळे महावितरण कडून थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी अनेक उपाययोजना केल्या जातात.

विज बिल वसुलीसाठी विशेष पथकांसोबत शेतकऱ्यांना आवाहन करत नावीन्यपूर्ण योजना सुरू केल्या जातात.
त्याच प्रकारातील ही नवीन योजना असून सरकारने 2021 मध्ये हे धोरण अमलात आणल्यानंतर  थकीत वीज बिलावर  सुरुवातीला 50% सूट देण्यात आली होती. त्यानंतर एक एप्रिल 2022 पासून 30%टक्के सवलत दिली आहे.

महिलेने कशी केली सफरचंद, खजूर आणि ड्रॅगन फ्रुटची संमिश्र शेती? जाणून घ्या

या योजनेनुसार जे शेतकरी 31 मार्चपर्यंत थकित वीज बिल भरतील त्यांना वीज बिलावर 30% सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या सवलतीचा लाभ घेण्याच्या आव्हान महावितरण तर्फे करण्यात आले आहे.

electricity bill of the agricultural pump काय आहे योजना ?

वर्षानुवर्षे कृषी पंपाची थकबाकी थकवणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरण तर्फे गेल्या वर्षीपासून कृषी धोरण 2020 राबविण्यात येत आहे.
तीन वर्षासाठी राबवण्यात येत असलेले या धोरणाचे दुसरे वर्ष असून येथे 31 मार्चला संपणार आहे. या धोरणाअंतर्गतचे शेतकरी 31 मार्चपर्यंत थकबाकी थकीत वीज बिल भरतील त्यांना वीज बिलावर 30% सूटके सूट देण्यात येणार आहे.आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात 13,456 शेतकऱ्यांनी 44 कोटी 20 लाख रुपये भरून या योजनेचा लाभ घेतला आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles