करंजी , प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात गावागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी करण्याचे काम स्थानिक पातळीवर स्थानिक आरोग्य अधिकारी करत असतात. मात्र जर त्यांच्यावर अधिक ताण येत असेल तर त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होत असतो. याच तणावातून करंजी येथील आरोग्य अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज घडली.
करंजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील प्रमुख डॉ. गणेश शेळके यांनी उपकैद्रातच पंख्याच्या हुकाला फाशी घेउन आत्मह्त्या केली. डॉ. गणेश शेळके मुळगाव -बहीरवाडी ता. नेवासा येथील रहिवासी आहेत. ते आज ड्युटीवर आले. त्यानंतर तिसगावला बोलावले आहे असे सांगुन निघून गेले. तेथून परत आल्यानंतर ते तणावाखाली असल्याचे उपस्थित असलेल्या आरोग्य सेविकाला जाणवले. त्यावेळी सर जास्त टेंशन घेउ नका नोकरीत असे चालुच असते असे संभाषणही सेविका आणि डॉ शेळके यांच्यात झाले.त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याने आत्महत्या केली.
आयसीटी पुरस्कार जाहीर; नाशिकचे चव्हाण यांचा समावेश
त्यानंतर ते पेन व कागद घेउन आले व टॅब जमा करा मी राजीराना लिहीणार आहे असे सांगून ते रुममध्ये गेले व दरवाजा आतुन लावुन घेतला.
साधारण दोन लसीकरण केल्यानंतर नर्सने जेवनासाठी डॉ. ना आवाज दिला आतुन आवाज येत नाही म्हणुन दरवाजा वाजवला पण आतुन कोणताही आवाज नाही आला म्हणुन फोन लावला व फोnहीउचलला नाही म्हणुन सर्व नर्स सेविकानी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला व खिडकीतुन पाहीले तर डॉ .पंख्याच्या हुकाला दोरी लावुन आरोग्य अधिकाऱ्याने आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले.
काय लिहले आहे सुसाईड नोटमध्ये ?
चिठ्ठीत सापडली असुन सदर चिठ्ठीत “आत्महत्या करत असुन त्यास तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे हे व प्रशासन सेवेतील तहसीलदार जिल्हाधिकारी हेही जबाबदार आहेत. अतिरिक्त कामाचा ताण तसेच वेळेत पगार नाही.व पगार कपातीची धमकी यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहुन ठेवले आहे”
डॉ शेळके यांचे पार्थिव उच्यस्तरीय तपासणीसाठी पाथर्डी येथे नेण्यात आले . या प्रकरणी पो . कॉ. सतीश खोमने व अरविंद च०हाण, भाउसाहेब तांबे व पोलीस निरिक्षक कौशल्य निरंजन वाघ हे अधिक तपास करत आहेत.
डॉ. शेळकेच्या आत्महत्यामुळे डॉक्टरांना असलेल्या ताण दिसुन येत आहे. कोरोनाच्या नावाखाली शासकीय कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांकडून जाच होत असल्याचे दिसत आहे.