बीड जिल्ह्यात कोरोना वाढतोय आष्टी तालुक्यात 33 रुग्णांची भर
बीड दि 19 मार्च, प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय .जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आज 33 कोरोना बाधित
आढळून आले.बीड जिल्ह्यात एकूण 294 बाधित आढळून आले आहेत.
बीडमध्ये कोरोना बधितांची संख्या शतक च्या वर आहे.चाचण्यांची संख्या वाढत असल्याने बधितांची आकडेवारी वाढत
आहे.चाचण्यामुळं धोके कमी होत आहेत.
बीड जिल्ह्यात 294 कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात 1911रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात
आली त्यापैकी 897 रुग्ण हे निगेटिव्ह आढळून आले आहेत.तर 294 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बीड
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हे बाधित आढळून आले आहेत.
बीड जिल्ह्यातील 294 बधितांमध्ये विविध तालुक्यामध्ये किती संख्या
आंबेजोगाई 58 आष्टी 33 बीड 117,धारूर 7, गेवराई 14,माजलगाव 26 केज 10 परळी 22 ,पाटोदा 1 शिरूर
04,वडवणी 2 अशा एकूण 294 रुग्णांची आज नोंद झाली.
आष्टी तालुक्यातील 33 बधितांमध्ये आष्टी येथील 11,कडा 9,मुर्षदपूर 01,टाकळसिंग 02, सुलेमान देवळा 03,कानडी
3,भातोडी 01, धामणगाव 02 आणि जामगाव 01 यांचा समावेश आहे.
आणखी वाचा:आष्टी तालुक्यातील शिक्षिकेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार,आरोपी अटकेत
दरम्यान आष्टी तालुक्यातील कडा येथे 9 कोरोना बाधित आढळून आल्याने दिवसेंदिवस संख्या वाढत आहे.या पार्श्वभूमीवर
अत्यावश्यक सेवा वगळता शनिवारी संपूर्ण गाव बंद असणार असल्याचे सरपंच दिपमाला ढोबळे यांनी सांगितले.
[…] […]