अहमदनगर जिल्ह्याच्या वैभवात भर;कॉफी मग म्यूझियम

- Advertisement -
- Advertisement -

मनोजकुमार सातपुते

ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या वैभवात आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे कॉफी मग म्यूझियम (Coffee mug museum).नगरचे प्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आतापर्यंत केलेल्या कॉफी मग संग्रह आता नागरिकांना म्यूझियमच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे.

काय आहे कॉफी मग म्यूझियम(Coffee mug museum). ?

आपण चहा किंवा कॉफी पितो. आपणास दररोज हे पेय पिण्याची सवय असते. मात्र हे पेय पिताना आपण वेगवेगळ्या आकाराचे कप किंवा मग वापरतो. हा मगचा वापर अनादी काळापासून सुरु आहे. विशेषतः युरोपियन देशामध्ये विविध आकाराचे,स्वरूपाचे आणि वस्तूंपासून बनवलेले मग आढळून येतात. आपल्याला मग म्यूझियम ही संकल्पना तिथे भेट दिल्यानंतरच लक्षात येते.

 

कोठे आहे कॉफी मग म्यूझियम(Coffee mug museum). मध्ये?

अहमदनगर शहराच्या गुलमोहर रस्त्यावर प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ आहे. याच ठिकाणी तुम्हाला हे कॉफी मग म्यूझियम (Coffee mug museum).पहावयास मिळेल.अत्याधुनिक पद्धतीने त्याची मांडणी केली आहे. अहमदनगर बस स्थानकापासून इथे येण्यासाठी तुम्हाला बस किंवा रिक्षा करावी लागेल. स्वतःच्या गाडीने तुम्ही अवघ्या १५ मिनिटात या स्टुडिओ पर्यंत पोहचू शकता.

कॉफी मग म्यूझियम (Coffee mug museum). मध्ये काय पाहणार?

छोट्याश्या एका खोलीच्या या म्यूझियम मध्ये 2500 हून अधिक कॉफी मग आहेत. अगदी प्राचीन काळातील कॉफी मग इथे पहावयास मिळतात.तर अलिकडले विविध आकाराचे..

कॉफी मग म्यूझियम Coffee mug museum
या दालनात प्रवेश केल्यास समोरच शेल्फ मध्ये हे कॉफी मग नजरेस पडतात . मग हळुवार या मगांचे निरीक्षण केल्यास त्याची विविधता लक्षात येते. या कॉफी मग म्यूझियम मध्ये अगदी 4 cm आकाराचा मग कप ते 15 लिटर क्षमतेचा कप मग आहे. आकाराचे प्रकार आणि तयार करण्याच्या पद्धतीचे प्रकार पहावयास मिळतात.अगदी कागदाच्या कापलेल्या चिठ्ठी पासून हे मग तयार केलेले आहेत. याबद्दलच्या आपल्या आठवणी सांगताना प्रमोद कांबळे म्हणाले कि, “मी मुंबईला प्रसिद्ध चित्रकार पिकासो पाबलो यांचे चित्र प्रदर्शन पाहण्यास गेलो होतो, तेंव्हा तिथे मी त्यांची आठवण म्हणून त्यांची सही असलेला मग घेतला. तेंव्हाच आमचे मित्र प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांचेहि कलीग्रफीचे प्रदर्शन होते. तिथेही मी त्यांची सही असलेले कॉफी मग घेतले, असे करत ही संख्या वाढत गेली. माझ्या या छंदामुळे मी जेंव्हा सचिन तेंडूलकर यांना भेटायला गेलो तेंव्हा त्यांची सही कशावर घ्यायची?हा प्रश्न पडला तेंव्हा मी सही मग वर घेतली आणि माझ्या संग्रहात नवीन कॉफी मगच्या प्रकाराची भर पडली. प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तींना भेटल्यानंतर त्यांचे ऑटोग्राफ मी या मग वर घेतल्यानंतर आजही संख्या मोठी झाली आहे.”

Coffee mug museum min 1

या  मग म्यूझियम Coffee mug museum मध्ये वेगवेगळ्या प्राणी यांचे चेहरे असलेले कॉफी मग, काचेचे, धातूचे, लाकडी, लेदर,कागद सिरेमिक, टेराकोटा असे विविध पद्धतीचे बनवलेले कॉफी मग आहेत.
वैशिष्ट्येपूर्ण कॉफीमग
या संग्रहात फेसाळणाऱ्या बिअर चा कॉफी मग आहे. ज्यामध्ये बिअर तुम्हाला फेसाळताना दिसते.मात्र अनुभव मात्र कॉफीचा असणार आहे. तसेच दुध पिणाऱ्या बाळाला आपल्या आईच्या स्तनातून दुध प्यायला आवडते. तशीच रचना या कॉफी मग ची असल्याने बाळाला दुध पिल्याचा फील मिळणार…

Coffee mug museum
चौकोन, त्रिकोण , अर्धाकृती अशा भौमितिक रचना असलेले कॉफी मग इथे पहावयास मिळतात.त्यासाठी या संग्रहालयाला आवश्य भेट द्यायला हवी…

Read More:१,४७,५००रुपयांची लाच घेताना होमिओपॅथी मेडीकल कॉलेजच्या प्राचार्यासह लिपिकास रंगेहात पकडले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles