नाग पंचमी 2021:विविध परंपरा

नाग पंचमी

 

manojkumar satpute

in article

ग्रामीण भागात विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकीचा एक श्रावणात येणारा सण म्हणजे नागपंचमी.

देशात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. निसर्ग आणि मानव यांना एकसंघ बांधणारा हा उत्सव असेच म्हणावे लागेल.

अनादी काळापासून नाग पंचमी हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात बत्तीस शिराळा, जामखेड येथील नाग पंचमीचा उत्सव वैशिष्ट्येपूर्ण असतो.किंबहुना हे ठिकाणे नाग पंचमी साठी प्रसिद्ध आहेत.

काय होते बत्तीस शिराळा येथे ?

नाग पंचमीचा उत्सव साजरा करण्यासाठी या गावातील सर्वच गावकरी १५ दिवस पूर्वी कामाला लागतात. लहान थोर मंडळी शेतातून, जंगलातून नाग पकडून त्याची पूजा करत त्याचा नाग पंचमी पर्यंत सांभाळ करतात. नागपंचमीला सार्वजनिक पूजा झाल्यानतर त्यांना निसर्गात मुक्त केले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयाच्या आदेशामुळे या पद्धतीने साजऱ्या  केल्या जाणाऱ्या  नाग पंचमी वर बंधने घालण्यात आले आहेत.

आज या गावात घरोघरी नागाची पूजा केली जाते. मात्र सार्वजनिक नागपूजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

हेही वाचा :अहमदनगर जिल्ह्याच्या वैभवात भर;कॉफी मग म्यूझियम

 

 

सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे शेकडोवर्ष जिवंत नागाची पूजा सुरु होती, मात्र 2002 पासून येथील नागपंचमीवर मर्यादा आल्या. उच्च न्यायालयाने,  नागांना  ताब्यात ठेवणे, मिरवणूक काढणे, यावर  महाराष्ट्रात पूर्णपणे  बंदी घातली. न्यायाल्याच्या आदेशानंतर, याठिकाणी नागाच्या प्रतिमेचे पूजन करून नागपंचमी साजरी केली जात होती. मात्र गेली दोन वर्ष करोनाचा पार्श्वभूमीवर शिराळ्यात नागमंचमी साजरी होत नाही.

 

जामखेड ची नाग पंचमी

जामखेड हे मराठवाड्याचे द्वार म्हणून ओळखले जाते. नागपंचमीला येथे मोठा उत्सव असतो. त्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. नागेश्वर मंदिरापासून मिरवणूक काढली जाते.मुळात:नाग हे शंकर महादेवाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे येथील मंदिरापासून मिरवणूक काढली जाते. पूर्वी या मिरवणूक मध्ये नर्तिका नाचविण्याची प्रथा होती मात्र ती आता मोडीत निघाली आहे.या काळात मनोरंजनाचे खेळ सुरु असत.

कोरोना स्थितीने या सर्व कार्यक्रमांना प्रतिबंध आला आहे.

 

नागपंचमीच्या अगोदरच्या दिवशी नाग साठी भाऊ म्हणून उपवास करण्याची  परंपरा आहे. आजही ग्रामीण भागात महिला या भावाचा उपवास करतात.तसेच जिवतीची पूजा केली जाते. घरातील भिंतीवर चित्र चिटकवून त्याची कापसाचे हार करून पूजा केली जाते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here