अकोले, ता.२५, प्रतिनिधी
आज क्रिसमस दिनाचे औचित्य साधून टाकेद येथील फादर व त्यांचे अनुयायी यांनी तिर ढे येथील कचरू सखाराम सारुकते याचे मालकीच्या जमिनीवर सियोन प्रार्थना केंद्र म्हणजे चर्च चे भूमिपूजन आयोजन करून त्यात आदिवासींचे धर्मांतर कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते याची कुणकुण आदिवासी विकास परिषद ,कार्यकर्त्यांना लागताच त्यांनी आदिवासी भागातील आपल्या कार्यकर्त्यांसह तिरढे येथे जाऊन हर हर महादेव,जय आदिवासी म्हणत हा कार्यक्रम उधळून लावला .
यावेळी भूमिपूजन करणाऱ्या व्यक्तीची पळता भुई थोडी झाल्याचे पाहायला मिळाले .कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते सापडले नाही तर साधकांनी गावातून बाहेर जाणे सोपे केले .
याबाबतचे वृत्त असे की गेली अनेक दिवसापासून तिरढे, पाडोशी, एकदरे,देवगाव,भंडारदरा या परिसरात टाकेद तालुका इगतपुरी येथील फादर व त्यांचे ठेकेदार आदिवासी भागात फिरून आदिवासींना तुमचे आजार बरे करू असे सांगत आपल्या धर्माकडे आकर्षित करत असल्याची चर्चा या परिसरात होती व २५ तारखेला क्रिसमस चे औचित्य साधून तिरढे येथे चर्च चे भूमिपूजन करण्याचे नियोजन झाले.
त्याकरता आजूबाजूच्या गावात प्रचार करून साधकांना बोलवण्यात आले .त्यापूर्वी कचरू सारुकते याची जमीन रवी केशव बागुल याचे नावे बक्षिसपत्र करून त्या जागेवर सियोंन प्रार्थना केंद्र म्हणजे चर्च चे भूमिपूजन ठरले याची कुणकुण आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव व कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट देऊन हा कार्यक्रम उधळून लावला .
स्थानिक सरपंच सौ गोडे व सदस्य यांनी ग्रामसभा बोलवून सरपंचाच्या अध्यक्षतेखाली आपले गाव आपले सरकार म्हणत गावात अंधश्रद्धा फोफवणाऱ्या व बळ जबरीने धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिस केस दाखल करण्याचा निर्णय घेतला त्यात उपस्थित पोलिसांकडे निवेदन ,तक्रार देण्यात आली .यावेळी बोलताना आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी ख्रिश्चन मशनरीचे फादर व त्याचे ठेकेदार आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्याच्या जमीन बळकावत आहे तसेच त्याना आजाराचे औषधें देऊन व लालच दाखवून त्याचे बळ जबरीने धर्मांतर करत असून गावातील कचरू सखाराम सारुक्ते याची जमीन घेऊन त्याच्या जागेवर चर्च बांधण्याचा कार्यक्रम करून आदिवासींना बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पडत आहे त्यामुळे प्रशासनाने त्याचेवर पोलीस कारवाई करावी अन्यथा आदिवासी संघटना आक्रमक होतील जिल्हा परिषदेचे मा . सदस्य बाजीराव दराडे यांनी हा धर्मांतराचा प्रकार दोन वर्षपासून सुरु असून सरकारी कर्मचारी यात सहभागी आहेत .
अज्ञान व गरिबीमुळे धर्मांतर होत असल्याचे ते म्हणाले . तर आदिवासी सेलचे अध्यक्ष सुरेश भांगरे ,जिल्हा परिषदेचे सरपंच परिषदेचे राज्य सचिव पांडुरंग खाडे , बाळू भांगरे , काळू भांगरे कुमारी चित्रा जाधव , यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या . तर सरपंच सौ संगीता गोडे यांनी आमच्या गावात चर्च होणार नाही तसेच अंधश्रद्धा पसरविणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होईल , व बळजबरीने धर्मांतर करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल तर अकोले पोलीस स्टेशनचे हवालदार व्ही एस साबळे यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाना कळविण्याचे मान्य केले .
Thanks for your concepts. One thing we’ve noticed is banks along with financial institutions are aware of the spending practices of consumers while also understand that most of the people max out and about their real credit cards around the getaways. They properly take advantage of this specific fact and commence flooding your current inbox along with snail-mail box using hundreds of no-interest APR card offers just after the holiday season concludes. Knowing that should you be like 98% of American community, you’ll rush at the possible opportunity to consolidate card debt and shift balances for 0 apr interest rates credit cards. jjjihkm https://headachemedi.com – what to take for Headache pain
Bardzo interesujące informacje! Idealnie to, czego szukałem! koncentrator tlenu koncentrator tlenu.