त्या ‘बिबट्या’चा मृत्यू की घातपात?
आष्टी । प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील मातावळी येथील डोंगरात आढळून आलेल्या मृत बिबट्या ची सखोल चौकशी व्हायला हवी.या बिबट्याचा मृत्यू नेमका कसा झाला?का घातपात झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आष्टी तालुक्यात बिबट्या मृत अवस्थेत सापडण्याची ही दुसरी वेळ आहे.यापूर्वी दोन वर्षांपूर्वी देवळाली परिसरातील डोंगरात एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला होता.मृत झाल्यानंतर तब्बल 15 दिवसापेक्षा अधिक कालावधी लोटला होता.त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे कळू शकले नव्हते.मात्र तो जाळ्यात अडकून मेला असावा असा कयास होता.त्याचाही घातपात झाला असावा .मात्र वन विभागाने फारसे गांभीर्याने घेतले नव्हते.आता पुन्हा बिबट्या मृत आढळून आल्याने संशय वाढला आहे.( बिबट्या मृत्यू घातपात)
आणखी वाचा:गहिनीनाथगड येथिल दिंडीस बसने जाण्यास परवानगी द्यावी- मा.आ.भीमसेन धोंडे यांची मागणी
बिबट्याची दहशत आष्टी तालुक्याने यापूर्वी अनुभवली आहे.आष्टी तालुक्यातील नागरिकांना बिबट्या पाण्यात दिसत असे.मात्र तो नरभक्षक होता.आता या मृत बिबट्याच्या सापडण्याने खळबळ उडाली आहे.एरवी जंगलात फिरणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हा बिबट्या कसा आढळून आला नाही.या मृत बिबट्याला अनेक दिवस झाल्याने तो कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.या बिबट्याच्या मृत्यूचे खरे कारण पुढं येणं आवश्यक आहे.दिवसेंदिवस शेड्युल 1 मधील प्राणी लुप्त होत आहेत.( बिबट्या मृत्यू घातपात)