Bharat Bandh Today Live Updates केंद्र सरकारचा केला निषेध

Bharat Bandh Today Live Updates

अकोले
Bharat Bandh Today Live Updates,किसान सभेसह विविध संघटना एकत्र येत अकोले तहसील कार्यालयांवर मोर्चा काढला.त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी करत सोयाबीन तहसील कार्यालयासमोर ओतून केंद्र सरकाने घेतलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातल्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.हे आंदोलन किसान सभा राज्य सरचिटणीस डॉ .अजित नवले यांच्या उपस्थितीत झाले.

Bharat Bandh Today Live Updates :राज्यातही मोठा प्रतिसाद

Bharat Bandh,सोयाबीनचे दर 11 हजार 111 रुपयांवरून कोसळून केवळ 20 दिवसांमध्ये 4000 रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेने सापडले आहेत….केंद्र सरकारने सोयाबीनच्या हंगामाच्या तोंडावर 12 लाख टन जी. एम. सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभे सह विविध संघटना एकत्र येत अकोले येथे तहसील कार्यालया समोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

in article

corona update: ५४६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर

केंद्र सरकारने 12 लाख टन सोयाबीनची आयात तातडीने थांबवावी, सोयाबीन उत्पादकांना न्याय द्यावा, ही प्रमुख मागणी या मोर्चात कण्यात आली. तीन काळे कायदे रद्द करावे या सह इतर मागण्या घेऊन किसान सभेच्या वतीने तहसील कार्यल्यावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून टाकला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here