भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले

bhandaradara dam overflow
bhandaradara dam overflow

bhandaradara dam overflow भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले

 

in article

अकोले

bhandaradara dam overflow  जिल्ह्यातील अकोले तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे भंडारादरा धरण आज पूर्ण क्षमतेने भरले.या धरणातून गेल्या अनेक दिवसापासून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी दरवर्षी धरण भरत असते. मात्र मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने पाण्याची आवक कमी झाली होती. दरम्यान दोन दिवसापासून या भागात होत असलेल्या पावसाने पुन्हा पाण्याची आवक सुरु झाली. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

धरण काठोकाठ भरले असुन या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये असलेल्या शेतक-यांना आनंद झाला असल्याचे दिसत आहे. भंडारदरा धरणाच्या ओव्हर फ्लो गेटमधुन ११३२५ क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.

पेरुची लागवड व्यापारी तत्वावर करणे गरजेचे

याच भागातील निळवंडे धरण ९० टक्के भरले असून त्यामधून विसर्ग सुरु आहे. या पाणलोटातील वाकी धरण,आढळा धरण १०० टक्के भरले आहेत.

अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेले भंडारादरा धरण कधी भरते याची उत्सुकता धरण लाभक्षेत्रातील नागरीकांना लागली होती.

11039 दलघफु क्षमतेचे असलेले ब्रिटीशकालीन भंडारादरा धरण असुन या धरणावर अहमदनगर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतीला पाणी खेळते. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतक-यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here