beed latest news पालकमंत्री यांच्या उपस्थितीत साखर कारखान्यांची संयुक्त बैठक संपन्न

- Advertisement -
- Advertisement -

 

ऊस तोडीचे नियमन करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी नियंत्रण ठेवावे – जिल्हा प्रशासनास सूचना

 

परळी

beed latest news राजकारण साधायला आगामी निवडणुका समोर आहेत, तिथे राजकारण करता येईल मात्र शेतकरी संकटात असताना ऊस गाळपावरून सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी राजकारण करू नये, सर्वजण शेतकऱ्यांची मुले आहोत, त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन प्रत्येक शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला जाईल, असे नियोजन साखर आयुक्त कार्यालय, जिल्हा प्रशासन व साखर कारखान्यांनी मिळून करावे अशा सूचना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील अधिक ऊस क्षेत्र असलेल्या उसाचे नियोजन करण्यासाठी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, ट्वेन्टी-ट्वेन्टी साखर कारखाना सायखेडा, अंबासाखर सहकारी साखर कारखाना, येडेश्वरी शुगर्स, जय महेश साखर कारखाना माजलगाव यांच्या प्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी तसेच साखर आयुक्त कार्यालय व जिल्हा प्रशासन यांची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठक घेत सूचना दिल्या आहेत.

कारखान्यांनी ठरवून दिलेला प्रोग्रॅम, त्याप्रमाणे झालेली नोंद, ठराविक कार्यक्षेत्र त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या परिस्थितीचाही विचार करावा. कोविड काळात जेव्हा ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मोठमोठे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी मिळून लोकांचे जीव वाचवण्यासाठी रात्रभर जागून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केला. याची आठवण करून देत, यावर्षी ऊस उत्पादन जास्त असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला ऑक्सिजन प्रमाणेच नियोजन करून उसाचा प्रश्न मिटवून द्यावा लागणार आहे, असेही या बैठकीत बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

आगामी काळात अनेक निवडणुका आहेत, ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी तिथे राजकारण जरूर करावे परन्तु शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने समन्वय साधून साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊस गाळपाच्या सूचना द्याव्यात असेही धनंजय मुंडे म्हणाले.

चांगल्या पावसाने यावर्षी ऊसाचे क्षेत्र वाढल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न असताना नोंदणीकृत व नोंदणी नसलेल्या सर्व ऊसाचे देखील व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुक्यातील दैनिक उसतोडीचे नियोजन व समन्वय साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्या-त्या तहसीलदारांना जबाबदारी द्यावी, साखर आयुक्त कार्यालय, तहसीलदार व साखर कारखाना प्रशासन यांनी मिळून राजकारण विरहित ऊसतोड केली जाईल याचे व 100% ऊस गाळप करण्याचे नियोजन करावे अशा सूचना धनंजय मुंडे यांनी दिल्या.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पाठींबा देण्यासाठी कडा बंद

या बैठकीस जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा मिसकर, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, साखर आयुक्त कार्यालयाचे समन्वयन अधिकारी, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, सुरेश मुंडे, राजाभाऊ चाचा पौळ, माणिकभाऊ फड, दिलीपदादा कराड, तसेच वैद्यनाथ कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिक्षितुलू, संचालक माऊली मुंडे, अश्रूबा दादा काळे, भाऊसाहेब घोडके, किसनराव शिनगारे, शेतकी अधिकारी तुकाराम गडदे, जय महेश कारखान्याचे बाळासाहेब जाधव, शेतकी अधिकारी श्री. पवार, ट्वेन्टी ट्वेन्टी कारखाना सायखेडा ता. सोनपेठचे शेतकी अधिकारी श्री. पवार, अंबासाखर कारखान्याचे शेतकी अधिकारी श्री. देशमुख, सुरेश मुंडे, येडेश्वरी कारखान्याचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

beed latest news ऊस तोडीचे नियमन करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी नियंत्रण ठेवावे – जिल्हा प्रशासनास सूचना

 

एका पेक्षा अधिक कारखान्याकडे नोंद असलेल्या उसाचा गोंधळ मिटावा यासाठीही दोन कारखान्यांमध्ये समन्वय असायला हवा असे मत धनंजय मुंडे यांनी मांडले व कारखाना प्रशासनाने आपसात बैठका घेऊन व साखर आयुक्त कार्यालयाच्या मदतीने हा गुंता सोडवावा तसेच वाहने व अन्य यंत्रणा वाढविण्यासाठी व वाहतुकीतील रस्त्यांची अडचण सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील असेही धनंजय मुंडे बैठकीत बोलताना म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles