Homeताज्या बातम्याबीड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे पदभार

बीड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे पदभार

बीड

लातूर येथील सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक यांनी पारीत केलेल्य आदेशानुसार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा बँकेच्या प्राधिकृत अधिकारी समितीचे अध्यक्ष म्हणुन गुरुवार (दि. १०) पदभार स्विकारला.


यावेळी प्राधिकृत अधिकारी समितीमध्ये सदस्य म्हणुन सतीश तोटावार, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड, सतीश पोकळे, जिल्हा विशेष लेखा परिक्षक, वर्ग-1, सहकारी संस्था, बीड, अशोक कदम, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (प्रशासन), बीड, अशोक कवडे, जेष्ठ विधिज्ञ, जिल्हा न्यायालय, अंबाजोगाई यांची सदस्य उपस्थित हाेते.


यावेळी बँकेचे अध्यक्ष व सदस्य प्राधिकृत अधिकारी समिती यांचा सत्कार बँकेच्या वतीने करण्यात आला. तसेच यावेळी अध्यक्ष व सदस्य यांनी मुख्य कार्यालयातील विभागनिहाय बँकेच्या प्रमुख अधिकारी यांचेकडुन तपशिलवार माहिती घेण्यात आली.

याप्रसंगी सर्व विभाग प्रमुखांना सुचना देण्यात आल्या. बँकेच्या कामकाजाचा आढावा संपल्यानंतर सर्व विभागांना प्रत्यक्ष भेटी देवुन तसेच बँकेच्या जिल्हा परिषद, बीड शाखेचा प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेवुन मार्गदर्शन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments