बीड
beed crime शाररीक सुंदरता ही निसर्गतः असते.ती बदलू शकत नाही.सुंदरता हा दागिना असतो मात्र सुंदरता दागिना न होता तो शाप झाला.आणि त्यामुळेच या महिलेला आपले काही वर्षे घरातील काळकोठडीत घालावे लागले. सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या बळाने या महिलेची घरातील बंदिवासातून सुटका झाली आहे.
ही घटना बीड येथे घडलीय. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चार वर्षा पासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार, बीड शहरातील जालना रोडवर उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे महिलेला मारहाण देखील केलेली आहे. त्याचबरोबर त्यांचे दोन मुलं देखील दहशतीखाली आहेत. घरामध्ये राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची आज सामाजिक कार्यकर्ते पोलीस आणि पत्रकार beed crime news यांनी सुटका केली. यावेळी त्या महिलेची अवस्था पाहून अक्षरशः कोणालाही रडू कोसळेल अशी अवस्था होती. तिला धड चालताही येत नव्हते.गेल्या 15 वर्षापासून हा अमानुष अत्याचार आणि नरक यातना या पिडीत महिलेला भोगाव्या लागल्या.
beed crime : अशी झाली सुटका
बीड शहरातील रूपाली किन्हिकर असे या पिडीत महिलेचे नाव.बीड शहरातील जालना रोड शेजारी राहणाऱ्या रूपाली मनोज किन्हिकर, या महिलेचां 20 वर्षांपूर्वी गडगंज श्रीमंत असलेल्या घरांमध्ये विवाह झाला. सुंदर आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून संसाराला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीच्या दोन-तीन वर्ष आनंदात गेले. त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्रास द्यायला सुरुवात केली. एका दुकानावर कामाला जात होती, मात्र पतीला माझ्यावर संशय आल्याने ते देखील बंद झालं. गेल्या 17 वर्षांपासून मला बाहेर जाऊ देत नाहीत, संशय घेतात पाच-सहा वर्षांपूर्वी घराच्या बाहेर आले होते, त्यानंतर आज बाहेर निघाले आहे, माझी मुलं आहेत. मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात देत मारहाण देखील करत असल्याचं पीडित महिलेने सांगितले.
एवढेच नाही तर वडील मरण पावले.तर अंत्यविधीला देखील जाऊ दिले नाही.अशीच परिस्थिती या महिलेच्या मुलांवर पण आली आहे. याबाबत या महिलेचे शेजारी मुसा भाई यांनी सांगितले कि, हा व्यक्ती पोटच्या मुलांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास देत असून हा माणूस नाही हा हैवान आहे. याने जिवंत महिलेला कोंडून ठेवलं, हे आम्ही गेल्या 10 वर्षापासुन पाहतोय. खुप सुंदर असलेली महिला आज 80 वर्षाची दिसतेय.
दिसायला सुंदर असल्याने पतीला नेहमीच त्रास होत असे. त्यामुळे तिला बाहेर जाऊ न देणे आणि सारखे संशय घेणे हे पतीकडून होत असे. याच मानसिकतेने या पतीने तिला डांबून ठेवले होते.या पती ने फक्त डांबूनच ठेवले नाही तर तिला मारहाण केली. तिच्या अंगावर या मारहाणीचे व्रण दिसत आहेत. तर काही ताज्या जखमा दिसत आहेत. तिची सुटका करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांनी सांगितले.
शिवाजी नगर पोलिस beed crime rate ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस आणि सामाजिक कार्यकते यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. अत्यंत कुबट वास असलेल्या ठिकाणी ही महिला आणि तिचे दोन मुले राहत होते त्यांची सुटका केली असून पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल आहे. असं पोलीस कॉन्स्टेबल पठाण यांनी सांगितलं. या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
शाळकरी मुलीची छेड रोड रोमियो विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल