Homeताज्या बातम्यालोकनेते सुरेश धस यांच्या विजयासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना साकडे

लोकनेते सुरेश धस यांच्या विजयासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना साकडे

शिरूर

beed ashti assembly elections विधानसभेचं बिगुल वाजलं आणि आणि जो तो नेता लोकांच्या दारा-दारात फिरू लागला आहे.सर्व जाती धर्मातील गोरंगरिबांचा नेता म्हणून जिल्हाभरात ओळख असणारे माजी आमदार सुरेश (आण्णा) धस सुद्धा रिंगणात उतरले आहेत.त्यांच्यासाठी पारधी समाजातील सतिष भोसले यांनी थेट मराठा आंदोलक मनोज (दादा) जरांगे यांना साकडे घातले असून सुरेश धस यांना विजयी करण्यासाठी तुम्ही मदत करा यासाठी काल त्यांनी अंतरवली (सराटी) येथे जाऊन त्यांना विनंती केली.

आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न चांगलाच चालला असल्याने राज्यातील अनेक नेते गेल्या महिनाभरापासून अंतरवली सराटीला चकरा मारत असून काहींनी तर थेट मुक्काम सुद्धा ठोकले असल्याने विधानसभा सभेला सुद्धा जरांगे फॅक्टर चांगला चालणार आहे.

त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यात आदिवासी फिरस्त्या लोकांवर प्रेम करणारा नेता म्हणून परिचित असणारे माजी आ.सुरेश धस यांच्यासाठी काल पारधी समाजातील उमलत नेतृत्व सतिष भोसले यांनी अंतरवली (सराटी) येथे जाऊन थेट मराठा आंदोलक मनोज (दादा) जरांगे यांना साकडे घालून आमच्या गोरंगरिबांच्या नेत्याला मदत करावी अशी विनंती केली आहे.मराठा आंदोलक मनोज दादा जरांगे यांनी आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे देखील सतिश भोसले यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments