Avinash sable बीडच्या अविनाश साबळे ने 30 वर्षापूर्वीचे अमेरिकेतील रेकोर्ड मोडले

- Advertisement -
- Advertisement -

 

 

बीड येथील धावपटू अविनाश साबळे Avinash sable याने आपली आंतरराष्ट्रीय स्तरावरील चुणूक पुन्हा दाखविली.अमेरिकेतील सन जुआन  san juan capistrano येथे झालेल्या राउंड रनिंग मध्ये त्याने 30 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

Avinash sable विक्रमवीर

अविनाश साबळे सध्या अमेरिकेत पुढील स्पर्धेसाठी तयारी करत आहे. सन जुआन कॅपिस्त्रोनो येथे झालेल्या स्पर्धेत त्याने 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील बहादूर प्रसाद याचे 1992 सालचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने हे अंतर अवघ्या 13:25:65 इतक्या वेळेत पूर्ण केले. यापूर्वीचा विक्रम हा बहादूर प्रसाद यांच्या नावावर होता. त्यांनी हे अंतर 13:29:70 इतक्या वेळात पूर्ण केले होते.

 

अविनाश याने गेल्या वर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे स्टीपल चेस या अडथळ्यांच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. देशात अविनाश ने धावण्याच्या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहेत.avinash sable hight.

मुळचा बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन आर्मी मध्ये भरती झाला. तेथून पुढे त्याचा धावण्याच्या स्पर्धेतील प्रवास सुरु झाला. त्यापूर्वी त्याने शालेय स्थरावर आणि कनिष्ट महाविद्यालायिन स्थरावर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles