Homeताज्या बातम्याअविनाश पाठक बीडचे नूतन जिल्हाधिकारी

अविनाश पाठक बीडचे नूतन जिल्हाधिकारी

बीड

Avinash Pathak is the new Collector of Beed अविनाश पाठक यांनी आज बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार दीपा मूधोळ मुंडे यांच्याकडून स्वीकारला.

बुधवारी दिनांक 26 जून रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सेवा यांनी अविनाश पाठक यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्याबाबतचे आदेश काढले होते. त्या आदेशाप्रमाणे आज दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार श्री पाठक यांच्याकडे आज सोपविला. तत्पूर्वी श्री. पाठक यांनी सकाळी आपल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार संगीता देवी पाटील यांना सोपविला.

याप्रसंगी  परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, कविता जाधव, महेंद्र कुमार कांबळे यासह वेगवेगळे विभागाचे विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments