आष्टी तालुक्यात पती-पत्नीचा संशयस्पद मृत्यू ashti crime news

पती-पत्नीचा संशयस्पद मृत्यू

कडा

in article

ashti crime news बीड जिल्ह्यातील वाघळुज येथील पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली.
मात्र ही आत्महत्या कशामुळे घडली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ईश्वर गुंड असे या मृत पतीचे नाव असून त्याचा मृतदेह रात्री उशिरा शेतामध्ये आढळून आला.’तर पत्नीचा मृतदेह सकाळी शेतामध्ये सापडला.

ईश्वर गुंड याचे वय 32 वर्ष असून त्याची पत्नी ही याच  वाघळुज गावातील आहे. या  दाम्पत्याला  एक  अपत्य  असल्याचे  कळते.

दोघेही पती-पत्नी शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाही. ही बाब उशिरा लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी शोधाशोध केली असता ईश्वर गुंड याचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला. त्यानंतर सकाळी त्याची पत्नी हिचा मृतदेह त्यात शेतामध्ये आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून येत आहे.

मात्र ही आत्महत्या का केली चे कारण गुलदस्त्यात आहे.

ईश्वर याने गावातीलच बंजारा समाजाच्या मुली बरोबर  आंतरजातीय विवाह केला होता. त्यांना एक मूलही झाले.

पोलिसांनी या दोघांचे प्रेत ताब्यात घेतले असून उत्तरीय तपासणीसाठी आष्टी येथे  ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.या घटनेचा तपास अंभोरा पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here