लघुउद्योगांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प

- Advertisement -
- Advertisement -

*लघुउद्योगांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प -खा.डॉ विखे*

नगर दि.१ प्रतिनिधी

कोव्हीड संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीनंतर सादर झालेला अर्थसंकल्प लघुउद्योगांना नव्या संधी देणारा आहे.यामाध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन् यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना खा.डॉ विखे पाटील म्हणाले की,शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल राखणारा हा अर्थसंकल्प आहे.यापुर्वी ग्रामीण भागासाठी असलेल्या योजना शहरांसाठी लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करुन त्यांनी सांगितले की जलजीवन मिशनच्या माध्यमातून शहरातही पाणी योजना सक्षम होवू शकतील. ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सुविधांवर अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात केलेल्या अर्थिक तरतूदीमुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळेल.यामाध्यमातून जिल्हा स्तरावर अद्यावत आरोग्य केंद्राची उभारणी करणे सोपे होईल.केव्हीड लससाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या तरतूदीचे त्यांनी स्वागत केले.

कृषी क्षेत्राला या अर्थसंकल्पाने नवी दिशा दिली आहे बाजार समित्यांचे अस्तित्व कायम राहणार असल्याचा विश्वास अर्थसंकल्पाने दिला असल्याचे स्पष्ट करून बाजार समित्यांचा पाया भक्कम करून शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाच्या विक्री व्यवस्थे करीता एक हजार बाजार समित्या आॅनलाईन पध्दतीने जोडून व्यवसायाच्या संधी दिल्या आहेत.फूड प्रोसेसिंग, सात मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क, आणि लघुउद्योगातून युवक महीला यांना मोठ्या संधी मिळतील, उत्पादन क्षमता वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील आदीवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात केलेल्या नविन योजना ग्रामीण भागातील शिक्षणासाठी नवी दिशा देण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल क्रांतिकारी असल्याचे डाॅ विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही :एम आय आर सी मध्ये स्वर्णिम विजय वर्षाच्या निमित्ताने सायक्लोथॉन चे आयोजन

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles