- Advertisement -
- Advertisement -
अहमदनगर —
अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी ने आंदोलनाची नौटंकी बंद करावी व जनतेसाठी एखादं कोव्हिडं सेंटर उभारावे अधिकारी ऐकत नसेल तर राजीनामा द्या असा सल्ला भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी आमदार यांना दिला.
सोशल मिडिया च्या माध्यमातून जनतेशी सवांद साधताना सीताराम भांगरे म्हणाले की, राज्यात १४४ कलम लागू असताना आमदार डॉ किरण लहामटे यांनी तहसील कार्यालयात आंदोलन करून राज्यातील आदेश पायदळी तुडवले असून त्यात अधिकारी ऐकत नाही असा सूर लावला. हे ऐकून आमदारांची कीव येते असा उपरोधिक टोला लगावला आहे.
आमदारांनी लहामटे यांनी पारनेर चे आमदार निलेश लंके सारखे एखादे कोव्हिडं सेंटर उभारावे, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या संकल्पनेतून अगस्ती आश्रम येथे सुरू झालेल्या कोव्हिडं सेंटर चे उद्घाटन करून आयजी च्या जीवावर बायजी उदार न होता काम करून दाखवावे.
आमदार यांनी पाटपाणी नियोजन ची वाट लावली असून मुळेचे पाणी पुलाच्या नावाखाली सोडून दिले आहे. मुळा उद्धवस्त करून झाले असून आता आढळा परिसर उजाड करण्याचे धोरण चालू आहे. सांगवीच्या धरणाचे पाणी सोडून दिले ते ना सावरगाव आले ना समशेरपूर ला त्यामुळं येथील शेतकरी अडचणी त आला आहे.
कोल्हार घोटी राज्य महामार्गाच्या कामाची वाट आमदारांच्या नाकर्तेपणा मुळे लागली आहे. सगळ्या मशनरी संगमनेर तालुक्यात गेल्यावर तालुक्यातील युवकांचा बळी गेल्यावर आंदोलनाची नौटंकी करण्याचे काम करीत आहेत. या युवकांच्या मृत्यला ठेकेदाराबरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा जबाबदार आहेत.
अकोले तालुक्यात जनतेला औषधे, ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर मिळाला पाहिजे. असेही मत सीताराम भांगरे यांनी व्यक्त केले आहे.
अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधीच अधिकारी ऐकत नाही हे त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियात टाकून त्या अधिकाऱ्याचा निषेध करताना त्यांना भूषणावह वाटत असेल पण अकोले तालुक्याच्या दृष्टीने ही दुर्दैवी गोष्ट आहे. हा तालुक्यातील जनतेचा अवमान आहे. फक्त भाषणातच म्हणायचे या तालुक्याने मामलेदार जाळला हा इतिहास आहे.
— श्री.भाऊसाहेब वाकचौरे, सरचिटणीस, भाजपा
अतिवृष्टी च्या अनुदान मिळावे यासाठी रस्ता रोको