अहमदनगर
Ahmednagar railway station नगर बीड परळी रेल्वे मार्ग व्हावा ही जिल्ह्यातील जनतेची अनेक वर्षाची मागणी मंजूर झाली.
आता प्रत्यक्षात रेल्वे सुरु होण्याचे स्वप्न साकार होत आहे. येत्या 3 फेब्रुवारी रोजी नगर ते आष्टी रेल्वे प्रत्यक्षात धावणार असून त्यासाठीची तयारी युद्ध पातळीवर सुरु आहे.
त्यासाठी अहमदनगर रेल्वे विभागाच्या वतीने जोरदार तयारी सुरु आहे.
नगर हून बीड कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील अरणगाव रस्त्यावर सुरक्षा फाटक बसविण्याचे काम सुरु आहे. या संपूर्ण मार्गावरील सुरक्षेची तयारी झाली झाली.
या मार्गावर दिनांक 3 किंवा 4 फेब्रुवारी रोजी ही रेल्वे धावणार असल्याने संपूर्ण सुरक्षेची तयारी सुरु आहे.
दरम्यान ही रेल्वे नगर आष्टी धावणार असल्याचे अधिकारी सांगत असले तरी वरिष्ठ पातळीवर रेल्वे थेट मुंबई पर्यंत धावण्याचे रेल्वे पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
Ahmednagar railway station कसे होणार उद्घाटन?
नगर बीड परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचे पूर्ण काम झाले आहे.आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह हे तीन स्टेशन पूर्ण झाले आहेत.
गेल्या महिन्यात या ट्रक वर रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण तपासणी करण्यात आली. या ट्रक वर १२० प्रती तास वेगाने मोठी रेल्वे धावली त्यामुळे या ट्रक वरील रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता ह्या रेल्वेचे उद्घाटन दिल्ली येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत.
त्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे आणि नगरचे खासदार डॉ सुजय विखे
यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईचे सुरक्षा आयोगाचे मनोज अरोरा, मुख्य प्रभारी अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता
दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता (बांधकाम नगर) विजयकुमार रॉय, सोलापूरचे चंद्रभूषण सिंग व अहमदनगर येथील
रेल्वेचे कार्यकारी अभियंता एस.सुरेश , विलास पैठणकर आदी अधिकारी उपस्थित असणार आहेत.
दरम्यान ट्रकची ट्रायल झाल्यानंतर ह्या मार्गावरून मुंबईपर्यंत रेल्वे सुरु व्हावी अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे
यांनी केली होती. Ahmednagar railway station त्यामुळे ही मागणी प्रत्यक्षात उतरणार असल्याचे दिसत आहे.