जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष निवडीत भाजपची सरशी; शिवाजी कर्डिले अध्यक्ष

- Advertisement -
- Advertisement -

 

अहमदनगर,

ahmednagar district cooperative bank च्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पद मिळविले. या निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला. तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला.

the ahmednagar district central cooperative bank चे अध्यक्ष उदय शेळके यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या संचालक मंडळात महाविकास आघाडीचे बहुमत असूनही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बाजी पलटवत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना पुन्हा एकदा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळवून दिले आहे. कर्डिलेंचा हा विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मोठा धक्का समजला जात आहे.

या जिल्ह्यात सापडला पाण्यावर तरंगणारा दगड

कर्डिले यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव केला. या पूर्वी ahmednagar district central co operative bank च्या सार्वत्रिक निवडणुकीत विखेंनी अजित पवारांना धक्का देत अंबादास पिसाळ यांचा विजय घडवून आणला होता. तोच पॅटर्न अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही पहायला मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक नऊ, काँग्रेसकडे तीन, विखे गट आणि भाजपकडे प्रत्येकी तीन तर शिवसेना पुरस्कृतकडे एक संचालक आहे. महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असूनही घुलेंना केवळ नऊ संचालकांची मते मिळाली.

त्यामुळे पराभव कसा झाला यावर महाविकास आघाडीतही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र शिवाजी कर्डिले यांनी हा विजय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घडवून आणल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

ahmednagar district cooperative bank च्या या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील राजकारण पाहता भाजपने आता जिल्ह्यातील संस्थांवर वर्चस्व निर्माण करण्याचा सपाटा सुरु केला असल्याचे दिसते.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles