चोरीच्या महागड्या मोटार सायकलसह 3 आरोपी जेरबंद

Ahmednagar crime motor cycle thief चोरीच्या महागड्या मोटार सायकलसह 3 आरोपी जेरबंद

नगर
Ahmednagar crime motor cycle thief स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील दुचाकी चोरणारी टोळी पकडली असून  या चोरांकडून 7 महागड्या मोटर सायकल जप्त केल्या आहेत.

in article

जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी मोटार सायकल चोरी करणारे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
पथक नगर शहर परिसरात फिरुन मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती घेत असताना दिनांक 30/01/2024 रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे राहुल निकल रा. विळदघाट, ता. नगर हा साथीदारासह देहरे येथून विळदघाट बायपास येथे चोरी केलेली विना नंबर लाल रंगाची पॅशन प्लस मोटार सायकल विक्री करणे करीता येणार आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पंचाना सोबत घेवुन, पथकाने  दोन संशयीत इसम विना नंबर लाल रंगाचे मोटार सायकलवर येताना दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.1, राहुल विजय निकम वय 24, रा. विळदघाट, ता. नगर मुळ रा. वडगांवगुप्ता, ता. नगर व 2, बंडु सुदाम बर्डे वय 29, रा. देहरे, ता. नगर या  ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी साथीदार नामे 3) अरुण बाळासाहेब धिरोडे वय 25, रा. बेलापुर, ता. श्रीरामपूर याचे सोबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, एमआयडीसी, निंबळक येथुन 4 व पुणे जिल्ह्यातील शिरुर व आळेफाटा येथुन 3 अशा विविध ठिकाणाहुन एकुण 7 चोरी केलेल्या मोटार सायकल पैकी तिन मोटार सायकल या त्याचेकडे व तिन मोटार सायकल या साथीदार बंडु बर्डे व एक मोटार सायकल ही साथीदार अरुण धिरोडे याचेकडे असल्याचे सांगितले. पथकास दोन्ही आरोपींकडे विविध कंपनीच्या 6 मोटार सायकल मिळुन आल्या व आरोपी नामे अरुण धिरोडे याचा बेलापुर ता. श्रीरामपूर परिसरात शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास चोरीची एक मोटार सायकलसह ताब्यात घेतले.
आरोपींचे कब्जातुन हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकलचे वर्णन खालील प्रमाणे –
अ.क्र. मोटार सायकलचा प्रकार चेसी नंबर इंजीन नंबर
1. हिरो होंडा पॅशन प्लस MBCHA10EL8GA12700 HA10EB8GA34123
2. बजाज पल्सर  150 MD2A11CY9KCF35190 DHYCKF54272
3. रॉयल इनफिल्ड क्लासिक  350 ME3U3S5C1GC562031 U3S5C1GC152825
4. होंडा ऍ़क्टीव्हा ME4JF505DG7097938 JF50E73097263
5. बजाज पल्सर 220 MD2A13EZ9FCD43511 UADKZCFD3180
6. हिरो होंडा सीडी 100 — —
7. बजाज पल्सर 150 MD2A11CZ8GWC27054 DHZWGC42397

ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन 6,30,000/- रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या 7 मोटार सायकल मिळुन आल्याने आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. 57/2024 भादविक 379 प्रमाणे दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here