रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्के
Ahmednagar जिल्ह्यात आज ९५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २७ हजार ८३५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ८१० इतकी झाली आहे.
ahmednagar जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये
११०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६४ आणि अँटीजेन चाचणीत २७८ रुग्ण बाधीत आढळले.
आणखी वाचा:वर्षा गायकवाड-टास्क फोर्सच्या स्पष्ट सूचना नंतरच शाळा सुरू होतील
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ०२, जामखेड १८, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १०, नेवासा ०२, पारनेर ३६, पाथर्डी ०२,राहता ०१, राहुरी ०२, संगमनेर २२, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०३, आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.