Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र केसरी स्पर्धेला अहिल्यानगर येथे प्रारंभ

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला अहिल्यानगर येथे प्रारंभ

अहिल्या नगर

Ahilyanagar Maharashtra Kesari 2025 लाल मातीतील संस्कार ही नगरची परंपरा आहे,मैदानाचे संस्कार हे खूप मोठे आहेत, क्रीडांगणे ओस पडत आहेत, राजकीय पाठबळ कुस्तीला मिळाल्याने हे कुस्ती पुढे जात असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

अहिल्यानगर येथील वाडिया पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आयोजक  कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, बीड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे, हिंद केसरी योगेश केसरी, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया आदी उपस्थित होते.

अहिल्यानगर येथे आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगत आहे. सकाळपासूनच या कुस्ती स्पर्धांना गादी गटात आणि माती गटात प्रारंभ झाला. या कुस्ती स्पर्धेचे औपचारिक  उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धेसाठी 43 जिल्ह्यातून माती आणि गादी अशा दोन्ही गटात प्रत्येकी 20 पैलवान सहभागी झाले आहेत.

यावेळी या स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांनी सरकार मध्ये महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवान यांना शासन दरबारी नोकरी मिळते मात्र दुसरा आणि तिसऱ्या क्रमांक मिळवलेल्या पैलवानांना शासनात नोकरी मिळाली पाहिजे यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments