अकोले, ता.२७:राजूर परिसरातील मित भाषिय ,इतरांचे दुःख समजून त्याला मदत करणारा शांतीदूत आपल्यातून गेल्याचे दुःख होत असून बोटावर मोजण्याइतकी माणसे असतात त्यापैकी सूर्यकांत उर्फ गटू भाऊ ओहरा होते.त्यंच्या निधनामुळे या आदिवासी परिसरात मोठी हानी झाली आहे . असे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .यावेळी ते भावनिक झाले त्यांना अश्रू आवरता आले नाही .राजूर येथील प्रतिथ यश व्यापारी ,सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत बाबुलाल ओहरा यांचे वयाच्या ८१ वया वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .त्यांच्या घरी जाऊन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी कुटुंबाचे सांत्वन केले .माजी मंत्री मधुकर पिचड हे कॉलेज संपल्यानंतर राजुरला आले त्यावेळी गटू शेठ यांच्या दुकानात ते येत असत . नगरशे ठ सुंदरलाल शहा,जगन्नाथ पाबलकर,सुंदरलाल ओहरा, मनिकलाल मेहता यांच्या गप्पा रंगत. ,त्यानंतर श्री .पिचड राजकारणात आले सभापती झाले,आमदार झाले,मंत्री झाले मात्र त्यांनी मैत्रीची नाळ तोडली नाही .साहेब हाच आमचा पक्ष असे म्हणत त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत गटू भाऊ मदतीसाठी तयार असायचे मात्र स्वतः राजकारणात गेले नाही .किराणा,कापड,दुकान चालवून तीन भाऊ एकदिलाने राहिले .एकमेकाच्या सुखदःखाच्या प्रसंगी धावून आले .बाळू शेट,शशिकांत यांनी त्यांना वडिलांच्या ठिकाणी मानले .मारवाडी समाजाचे ट्रस्टी असताना त्यांनी सुंदर मंदिराची स्थापना केली .आदिवासी भागातील लोकांचे ते आधारवड होते .माझ्या समाजकारणात राजकारणात त्यांनी मला सतत साथ दिली .माझ्या कुटुंबातील ते एक घटक असल्याचे माजी मंत्री पिचड यांनी सांगताना त्यांनी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली .यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक ग्रामस्थ उपस्थित होतेकोरोना मूळे पन्नास व्यक्तींनी जाऊन त्यांचा अंत्यविधी पार पाडला.राजूरच्या व्यापारी संघटनेने कडेकोट बंद ठेवून सुर्यकांत ओहरा यांना श्रद्धांजली वाहिली . यावेळी सरपंच गणपत देशमुख , प्रकाश सहा , भास्कर एलमामे, गोकुळ कानकाटे,संतोष बनसोडे , सत्य निकेतन संस्थेचे ठकाजी कानवाडे,मिलिंद उमराणी , किरण माळवे, श्रीराम पन्हाळे , श्रीनिवास एलमामे ,शांताराम काळे , देविदास शेलार ,ललित चोथवे ,उपस्थित होते . शशिकांत ओहरा यांनी उपस्थितांनी आपल्या कुटुंबावर प्रेमामुळे मोठ्या संख्येनेपारीस्रातील लोक इथे आले मात्र कोरोनामुळे अंत्यविधी ठिकाणी गर्दी न करता प्रश्सानाला सहकार्य करावे असे आव्हान केले त्यमुळे केवळ ५० नातेवाईक यांनी जाऊन अंत्यसंस्कार केले .
[…] आणखी वाचा :राजूर परिसरातील मीत भाषीय श… […]