माजलगाव दि 18 फेब्रुवारी प्रतिनिधी
बीड जिल्ह्यामध्ये लाचलुचपत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया वाढत असून बीड येथील गटविकास अधिकारी यांना लाच घेताना पकडल्यानंतर आज माजलगाव येथे चालकामार्फत 65 हजाराची लाच घेताना उपविभागीय अधिकारी यास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
माजलगाव तालुक्यात होत असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या तक्रारदार व्यक्तीकडून 65 हजार रुपयांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांचा चालक काळे यास माजलगाव येथील चौकात जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.त्यानंतर या लाचेची खात्री केल्यानंतर उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. माजलगाव पोलिस ठाण्यात या संदर्भात उपविभागीय अधिकारी गायकवाड आणि चालक काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान बीड येथे बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. बीड जिल्ह्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया वाढत असून लाचखोर या विभागाच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी लाच घेणाऱ्या शासकीय कर्मचारी किंवा लोकसेवक यांच्या विरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
हेही वाचा:लाचखोर गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळयात
[…] हेही वाचा:चालकामार्फत 67 हजारांची लाच घेताना उपव… […]