शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत

- Advertisement -
- Advertisement -

पंप पुन्हा नादुरुस्त झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत

अहमदनगर दि.१७ प्रतिनिधी
मुळानगर पंपींग स्टेशन येथील ७२५ अश्वशक्तीचा पंप नादुरुस्त झालेला होता. हा पंप मंगळवार दि.१६ रोजी दुपारी २.०० वाजता दुरुस्त करुन दोन दिवसापासून विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा पुर्व पदावर आणण्याचे प्रयत्न सुरु होते.मात्र आज  पहाटे ३.३० वाजता पुन्हा मुळानगर पंपींग स्टेशन येथील ७२५ अश्वशक्तीचा पंप नादुरुस्त झालेला आहे. हा  नादुरुस्त पंप दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतलेले आहे. परंतु पंप दुरुस्तीचे कामास अवधी लागणार आहे.
रविवार दि.१४-२-२०२१ रोजी अहमदनगर शहर पाणीपुरवठा
मुळानगर पंपींग स्टेशन येथील ७२५ अश्वशक्तीचा पंप पुन्हा नादुरुस्त झाल्यामुळे
अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्व उपनगर भागास दैनंदिन अपेक्षित असणारा पाणी उपसा पुर्ण क्षमतेने करणेस अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे दि.१६-२-२०२१ रोजीपासून रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्व उपनगर भागास उशिराने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. पंप दुरुस्तीचे काम पूर्ण होउन पूर्ण क्षमतेने पाणी उपसा पुर्ववत होईपर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

हेही वाचा:ऐतिहासिक लिखाणातून समाजमनाच्या स्थित्यंतराबाबत माहिती मिळावी-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles